29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयमणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी थोड्याच वेळात मुंबईत पोहचणार

मणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी थोड्याच वेळात मुंबईत पोहचणार

मणिपूरमध्ये दंगल भडक्याने गेले काही दिवस तेथील परिस्थिती अतिशय चिघळलेली आहे. अशा संकटकाळात महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरध्वनीवरून संवाद साधला होता. त्यानंतर प्रशासनाला विद्यार्थ्यांना परत आणण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने देखील शीघ्रपणे विमानाने विद्यार्थ्यांना परत आणण्याचे नियोजन केले. आज (दि.8) रोजी सायंकाळी 6.30 वाजता विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे.

मणिपूरमधील परिस्थिती गेल्याकाही दिवसांपासून चिघळली असून, तेथे भडकलेल्या दंगलीमुळे आणिबाणीची परिस्थिती निर्मान झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी तेथे अडकुन पडले होते. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुलांची काळजी वाटत होती. तसेच विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी देखील अनेक लोकप्रतिनीधींनी देखील केली होती.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सर्व परिस्थिती लक्षात घेत तातडीने मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची चौकशी केली. तसेच विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन देखील दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी निर्देश दिले. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूर एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र तेथे उद्भवलेल्या दंगलीमुळे विद्यार्थी भीतीच्या छायेखाली होते. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना खास विमानाने परत आणण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

साई भक्तांसाठी मोठी बातमी; साईबाबांच्या शिर्डीचा कायापालट होणार!

IPS महेश पाटील आणि सुनिल कडासने यांची बदली

पुणेकरांचा नाद नाय: ट्रॅक्टर मोर्चा काढत शेतकरी बांधवांचा ‘टीडीएम’ चित्रपटाला फुल सपोर्ट!

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली असून हे विमान सायंकाळी ४.३० वाजता हे विमान गुवाहाटी येथून मुंबईकडे प्रयाण केले आहे. तसेच मणिपूरच्या इंफाळ येथून हे विद्यार्थी गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान हे विमान मुंबई विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी