29 C
Mumbai
Monday, September 4, 2023
घरराष्ट्रीयअसहकार चळवळीला 123 वर्ष पूर्ण

असहकार चळवळीला 123 वर्ष पूर्ण

स्वतंत्रपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात लोकमान्य टिळकांच्या मृत्युंनंतर स्वातंत्र्यलढ्याची सर्व सूत्र महात्मा गांधी यांच्याकडे आली. त्यांनी शांतता, अहिंसा आणि असहकार मार्गाने इंग्रजांच्या राजवटीविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला. असहकार चळवळ भारतीय स्वातंत्र्याच्या व्यापक चळवळीपैकी एक महत्वाची चळवळ मानली जाते.

13 एप्रिल 1919 रोजी इंग्रजानी जालियनवाला बाग हत्याकांड घडवले. निष्पाप आणि निशस्त्र जीवांवर बेछुट गोळीबार झाल्याने संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण होते. 1920 साली भारतीय काँग्रेसचे नेतृत्व गांधीकडे आले. इंग्रजांचा सर्वतोपरी बहिष्कार करण्यासाठी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ उभारली.

असहकार चळवळीचे स्वरूप –
ब्रिटिशांशी असहकार पुकारून त्यांच्या राजवटीविरोधालढा देण्याची योजना गांधींनी आखली. परदेशी मालावर बहिष्कार घालणे, वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकणे,ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या नाकारणे,वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकणे, सरकारी शाळा महाविद्यालयांमध्ये न जाणे आदीबाबत गांधींनी समस्त भारतीयांना सूचना दिल्या.

हे ही वाचा 

लोकनेता शाहीर साबळे यांची शंभरी!

इस्त्रोच्या आदित्य एल 1 मोहिमेत पुण्यातील आयुका’ संस्थेचा सहभाग; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक

मोहन भगवतांना सुद्धा जेल मध्ये टाकू : प्रकाश आंबेडकर

असहकार चळवळीविरोधात इंग्रजांनी भारतीयांवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात वाढ केली. उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे आंदोलकानी शांततापूर्ण मिरवणूक काढली होती. पोलिसांनी आंदोलकावर लाठीहल्ला केला. संतापलेल्या आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली. या आगीत काही पोलीसांचा मृत्यु झाला. चौरी चौरा घटनेनंतर अखेरीस गांधींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ तातडीने थांबवली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी