29 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरराष्ट्रीयशरद पवारांनंतर माझा नंबर लागतो : मल्लिकार्जून खर्गे

शरद पवारांनंतर माझा नंबर लागतो : मल्लिकार्जून खर्गे

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत मोदी सरकारविरोधात काय रनणीती असावी यावर खलपते झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आगमी काळात प्रत्येक राज्याच्या राजधाणीत आम्ही बैठका घेणार असल्याचे जाहीर करत त्यांनी आता त्यांनी मोदींवर टीका केली.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, जवळपास शरद पवार यांच्यानंतर माझा नबंर लागतो. मी देखील गेल्या 55 वर्षांपासून राजकारणात आहे, आणि गेल्या 52 वर्षांपासून आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य आहे. मी असे कधीच नाही पाहिले, कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही, मात्र आज मोदीनी अशी गोष्ट केली आहे, त्यांनी बिझनेस एडवायजरी कमिटीला विचारले नाही. विरोधी पक्ष नेत्याला बोलाविले नाही, कोणालाही न विचारता संसदेचे विषेश अधिवेशन त्यांनी बोलाविले आहे.

खर्गे म्हणाले, जेव्हा मणिपूर जळत होते तेव्हा विशेष अधिवेशन बोलावले नाही, कोरोना काळात बोलावले नाही, चीन आपली जमीन बळकावत होता तेव्हा बोलवले नाही. लोक नोटबंदीमुळे परेशान होते, स्थलांतरीत कामगार परेशान होते, त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही. मग आता का विषेश अधिवेशन बोलावले आहे, मला माहिती नाही. आजचा अजेंडा काय आहे, तो माहिती नाही, ही देश चालविण्याची पद्धत नाही. हे हळूहळू हुकुमशाहीकडे जाण्यासारखे आहे.

खर्गे म्हणाले हे लक्षात घ्यायला हवे मीडिया देखील त्यांच्यासोबत आहे, हे एक त्यांच्या डोक्यात आहे. प्रेस माध्यमे असोत, टीव्ही असे हे सगळे माझ्याकडे आहे. हे त्यांचे म्हणणे आहे. आम्हाला देखील कधी कधी तसे वाटते. असे म्हणत माध्यमांना उद्देशून ते म्हणाल, तर जी काही वस्तूस्थिती आहे, आपल्या तोंडाला देखील कुलुप लावले आहे. तुमचे देखील हात बांधले आहेत, हे सगळे ते (मोदी) करत आहेत आणि आपण हळूहळू हुकुमशाहीकडे चाललो आहोत. असे खर्गे म्हणाले.

मोदी सरकारच्या भ्रष्टाचारावर देखील खर्गे यांनी यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले त्याचे भ्रष्टाचार छोटे मोठे नसतात. मात्र कॅगच्या अहवालात दाखवले आहे, किती कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यांचा भ्रष्टाचार अदृष्य असतो अशी टिका त्यांनी केली. खर्गे म्हणाले, मोदी नेहमी म्हणतात मै न खाऊंगा न खाने दुंगा मात्र खायला तर ते सगळ्यांनाच देत आहेत, आपल्या जवळच्या लोकांना ते खायला देत आहेत. मात्र लोकांना ते उपाशी मारत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आवाज उठविला असल्याचे खर्गे म्हणाले.

हे सुद्धा वाचा 
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी केले ‘रास्ता रोको’
मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाची उरलीसुरली लाज गेली!
अजित पवार गट घड्याळाच्याच आशेवर

आज महाविकास आघाडीने जे पाऊल उचलत आम्हाला आमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसे आणि सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम येथे घेतला तो यशस्वी झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीचे मी आभार मानतो असे देखील खर्गे म्हणाले. यापुढे देखील बैठका होतील. 5 -6 ठिकाणी सार्वजनिक बैठका होतील. त्याबद्दल आम्ही वेळोवेळी कळवू, मोदीजींनी कितीही प्रयत्न करोत आम्हाला तोडण्याचे आम्ही भिणार नाही, असे खर्गे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी