28 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरराष्ट्रीयमणिपूरमध्ये नग्न धिंड काढलेल्या महिलांमधील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या माजी सैनिकाची पत्नी

मणिपूरमध्ये नग्न धिंड काढलेल्या महिलांमधील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या माजी सैनिकाची पत्नी

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच या पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीचा असल्याचे समोर आले आहे. मणिपूरच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. पीडित महिलेने त्यांच्याशी बोलताना सांगितले की, आम्हा दोघी महिलांना हजारो पुरुषांच्यासमोर बंदूकीच्या धाकाने अंगावरील कपडे काढले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला त्रास दिला आमची धिंड काढली असे देखील त्यांनी सांगितले.

चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात आसरा घेतलेल्या माजी सैनिकाने (वय ६५) सांगितले की सांगितले की, माझ्या पत्नीला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. मात्र आमच्या मुलांकडे पाहून त्यांच्यासाठी ती पुन्हा जगण्यासाठी बळ एकवटू पाहत आहे. ते म्हणाले 3 आणि 4 मे रोजी हजारोंच्या संख्येने लोकांच्या झुंडीने गावावर हल्ला केला. घरे, एक चर्च आणि अनेक पाळीव जनावरे त्यांनी मारुन टाकली. तो जमाव 4 मे रोजी आमच्या गावात आला आणि घरे जाळणे सुरु केले. त्या भीतीने अनेक लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. माझ्या पत्नीची आणि माझी चुकामुक झाली. त्यावेळी ती आणि गावातील चौघेजण जंगलातील एका झाडाच्या पाठीमागे लपून बसले. काही हल्लेखोर आमच्या पाळीव जनावरांचा (डुक्कर, बकऱ्या, कोंबड्या)चा पाठलाग करत असताना जंगलात घुसले. यावेळी जंगलात लपलेल्या माझ्या पत्नीला आणि चार जणांना त्यांनी पाहिले आणि पकडले.

पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, माझी पत्नी आणि आणि दुसरी एक महिला तसेच तिचे एक लेकरु, आणि दुसऱ्या एका कुटुंबातील तिघे (वडील, मुलगा आणि मुलगी) होते. त्यांना जेव्हा बाहेर आणले तेव्हा पोलिसांचे एक वाहन तेथे दिसले ते काही प्रयत्न करणार पण जमावाने पोलिसांना न जूमानता त्यांनी माझ्या पत्नीला आणि इतर चौघांना वाहनातून बाहेर ओढले.

त्यानंतर तीन महिलांना कपडे काढण्यास सांगितले. एका महिलेच्या काखेत लहान मुल होते. तीला जमावातील काही लोकांनी जाण्यास सांगितले. तर जमावातील काही जण दुसऱ्या तरुणीसोबत छेडछाड करत होते. त्यावेळी तीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला विरोध केला तेव्हा त्यांना मारुन टाकण्यात आले.

एफआयआरमध्ये नमुद केल्याप्रमाणे, नंतर जमावाने त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, सामुहिक बलात्काराबाबत ठोसपणे सांगितले जावू शकत नाही, कारण ती तरुणी सापडलेली नाही. पिडीत महिलेचा पती माजी सैनिकाने सांगितले की, नंतर तीचा प्रियकर तीला सोबत घेऊन गेला. जवळपास दोन ते तीन तास तीच्यासोबत दृष्कृत्य करण्यात आले.

हे सुद्धा वाचा 
आपदग्रस्तांच्या मदतीसाठी लालबागचा राजा आला धावून !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार

प्रा. एम. एस. शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या याविषयी अधिक माहिती 

आम्ही डोंगरांत आसरा घेतला. रात्री मी माझ्या पत्नीसोबत पुन्हा गावात आलो, तरुणीला तीचा प्रियकर घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही चालत निघालो, त्यात काही गर्भवती महिला देखील होत्या. काही लोक वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी