30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरराष्ट्रीयमणिपूर महिला अत्याचाराच्या घटनेने देशात संतापाची लाट

मणिपूर महिला अत्याचाराच्या घटनेने देशात संतापाची लाट

मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. ईशान्येकडील राज्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे दुसऱ्या बाजूचे काही लोक एका समाजातील दोन महिलांना नग्न करून रस्त्यावर फिरत आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळ पासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यातील ही घटना आहे. हा व्हिडिओ 4 मे चा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावरही व्हायरल झाला आहे. घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

हा व्हिडीओ गुरुवारी इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमकडून सोशल मीडीयात वायरल असलेल्या या व्हिडिओवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना नग्न अवस्थेत दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये पुरुष पीडित महिलांचा सतत विनयभंग करताना दिसत आहेत. गुन्हेगारांनी हा व्हिडिओ बनवल्यानंतर व्हायरलही केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या निरपराध महिलांवर होणारा भयंकर अत्याचार अनेक पटींनी वाढला आहे. या प्रकारातील दोषींवर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता समोर येत आहे. दरम्यान त्यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी या प्रकरणी कडक पावलं उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्वतः हून मणिपूर हिंसाचाराची दखल घेत मणिपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या घटनेने 140 कोटी भारतीयांना लाजवले आहे. कायदा पूर्ण ताकदीने काम करेल आणि दोषींना सोडले जाणार नाही. ईशान्य राज्यातील वांशिक हिंसाचारावर न बोलल्याबद्दल विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेच्या दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “माझे हृदय वेदना आणि रागाने भरले आहे.”

हे सुद्धा वाचा:

जीएसटी कायद्यात दुरुस्तीचे विधेयक विधान सभेत मंजूर

विरोध होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाला ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिली भेट

बॉलीवूडमधून देखील या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला आहे. सोशल मीडीयात राहुल गांधी, आदित्य ठाकरे, प्रियंका गांधी ते अभिनेता अक्षय कुमार यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी