32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराष्ट्रीयManish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

Manish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

आम आदमी पार्टीचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली आहे. शुक्रवार (दि.19 ऑगस्ट) ला सकाळीच सीबीआयचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले.

भ्रष्टाचाराच्या विरोधात स्थापन केलेल्या आम आदमी पार्टी या पक्षांतील मोठया नेत्याची सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. केंद्र सरकारने देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले आहे. त्यामध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहेत. आम आदमी पार्टीचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली आहे. शुक्रवार (दि.19 ऑगस्ट) ला सकाळीच सीबीआयचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सिसोदिया यांच्या घरी देखील छापेमारी झाली. दिल्ली आणि पंजाबशिवाय सात राज्यांमध्ये 21 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सिसोदियांसह आणखी सात अधिकारी सीबीआयच्या निशाणावर आहेत.

मनीष सिसोदिया यांनी कारवाईनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली आहे. ‘‍आम्ही लाखो मुलांचे भविष्य बनवत आहोत.’ आमच्या देशात जो चांगले काम करतो. त्याला त्रास दिला जातो. त्यामुळेच आमचा देश एक नंबरवर पोहोचू शकत नाही’.
सिसोदियांनी तपासयंत्रणांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात सीबीआयला काहीच सापडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआय तपासावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.

केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ‘हे लोक दिल्लीचा विकास रोखू पाहत आहेत’. त्यासाठी त्यांनी ही छापेमारी केली आहे. आम्ही दिल्लीमधील चांगले काम थांबवू शकत नाही. अमेरिकेतील वर्तमानपत्र ‘एनवायटी’ने पहिल्या पानांवर दिल्लीच्या शिक्षण मॉडलची स्तुती केली आहे. मनीष स‍िसोदियाचे फोटो छापले आहेत. आम आदमी पार्टीची स्थापना 2 ऑक्टोबर 2012 मध्ये झाली. त्यानंतर अल्पावधीमध्येच या पक्षाचे सरकार अस्तीत्वात आले. अरविंद केजरीवाल, योगेंन्द्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार यांचे आम आदमी पार्टीसाठी मोठे योगदान आहे.

हे सुद्धा वाचा

BMC : प्रवेश नाकारणा-या शाळांकडे मुंबई महानगपालिकेचे सपशेल दुर्लक्ष

Dahi Handi 2022 : शासकीय रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार

Ajit pawar : अजित पवारांची पुन्हा फटकेबाजी, सत्ताधारी बावचळले

कोण आहेत मनीष सिसोदिया ?
मनीष सिसोदिया हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सुरूवातीला मीडियाशी संबंधीत एक कंपनमध्ये काम करत होते. त्याच वेळेला ते ‘कब‍िर’ आणि ‘पर‍िवर्तन’ नावाच्या एका सामाजिक संस्थेमध्ये संचालक होते. ते आरटीआय कार्यकर्ता आहेत. ते अरविंद केजरीवाल यांच्या सोबत ‘सार्वजन‍िक ह‍ित अनुसंधान फाउंडेशन’मध्ये सह संस्थापक आहेत. ते ‘अपना पन्ना’ नावाच्या मासिकाचे संपादक आहेत.

मनीष सिसोदिया अण्णा हजारेंच्या सोबतच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रमुख आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सोडून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर मनीष स‍िसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांना साथ दिली. मनीष सिसोदिया हे 26 नोव्हेबर 2012 साली स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते पटपडगंज विधान सभा क्षेत्रात विजयी झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी