30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीय‘मार्गारेट आल्वा‘ एनसीपीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा

‘मार्गारेट आल्वा‘ एनसीपीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा

टीम लय भारी

नवी दिल्ली: शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज तासभर बैठक झाली. या बैठकीला 17 पक्षांचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘मार्गारेट अल्वा’ यांना उपराष्टपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली. तर एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत मार्गारेट अल्वा:
‘मार्गारेट आल्वा’ या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. त्या 6 आॅगस्ट 2009 ते 14 मे 2012 पर्यंत उत्तराखंडच्या पाहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्य आहेत. अखिल भारतीय काॅंग्रेस समितीच्या त्या आमसचिव आहे. त्यांना ‘मर्सी रवि अवार्ड’ प्राप्त झाला आहे. साडेचार दशकांच्या कारकिर्दीतील चार दशके दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घालवली आहेत.

‘मार्गारेट अल्वा’ या काँग्रेस  उमेदवार म्हणून पहिल्यांदा १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. १९७४ ते १९९८ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या.  ६ ऑगस्ट २००९ ते १४ मे २०१२ पर्यंत त्यांनी उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले. उत्तराखंडच्या राज्यपाल पदी काम केल्यानंतर त्या २०१२ ते २०१४ पर्यंत राजस्थानच्या राज्यपाल होत्या.

मार्गारेट अल्वा यांचे ‘करेज अँड कमिटमेंट’ हे आत्मचरित्र आहे. इंदिरा गांधीए राजीव, गांधी, नरसिंह राव आणि सोनिया गांधी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेल्या अल्वा काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाच्या चार दशकांच्या साक्षीदार आहेत. या काळातील अनेक महत्त्वाच्या घटना अल्वा यांनी आपल्या दृष्टीने मांडल्या असल्या तरी त्यातील सोनिया गांधी,नरसिंह राव यांच्यातील संघर्षामागील नेमक्या कारणांपर्यंत जाण्याच्या वाटा सोप्या केल्या आहेत.

हे सुध्दा वाचा:

पेट्रोल डिझेल स्वस्त झाले ! बघा…आता…काय काय महाग झाले…..

यशाचे श्रेय घेण्यात ‘अमित शाह’ हुशार

विमान कंपन्यांचे दुर्लक्ष; पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा उतरवले विमान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी