27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयआता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

टीम लय भारी

नवी दिल्लीः संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु होणार आहे. या अधिवेशनात असंसदीय शब्दांचा वापर करण्यावर बंदी आहे.  असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हुकूमशाह, तानशाहा, विनाशपुरुष तसेच असत्य, भ्रष्ट, काळाबाजार आदी शब्द वापरण्यावर बदी आहे. लोकसभा सचिवालयाच्या नवीन पुस्तकामध्ये या शब्दांना असंसदीय शब्दांच्या यादीत टाकले आहे. 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील एक असंसदीय शब्द राज्यसभेत काढून टाकण्यात आला होता. लोकसभा सचिवालयाने हिंदी आणि इंग्रजी भाषेमधील असंसदीय शब्दांची 13 जुलैलाच जारी केली.

असंसदीय ‘हिंदी’ शब्दांची यादी:

शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, खालिस्तानी, खून से खेती, जुमलाजीवी, गद्दार, गिरगिट, ठग, घडियाली आंसू, अपमान, असत्य, भ्रष्ट, कालादिन, कालाबाजारी, दंगा, दलाल, दादागिरी, दोहरा चरित्र, बेचारा, बाॅबकट, लाॅलीपाॅप, विश्वासघात, संविधानहीन, बहरी सरकार, उल्टा चोर कोतवाल को डांटे, उचक्के, अहंकार, कांव कांव करना, गुंडागर्दी, गुलछर्रा, गुल खिलाना, गुंडोंका सरकार, तलवे चाटना, गुल खिलाना, चोर चोर मौसेरे भाई, चैकडी, तडीपार, तानाशाह आणि दादागिरी.

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

 असंसदीय ‘ इंग्रजी’ शब्दांची यादी:

Anarchist, Bloodshed, Bloody, Betrayed, Ashamed, Abused, Cheated, Chamcha, Chamchagiri, Chelas, Childishness, Corrupt, Coward, Criminal, Crocodile tears, Disgrace, Donkey, Drama, Eyewash, Fudge, Hooliganism, Hypocrisy, Incompetent, Mislead, Lie and Untrue

असंसदीय ‘शब्द’ म्हणजे काय?

जगातील अनेक देशांच्या संसदेमध्ये, अधिवेशानामध्ये अनेक वेळा वादविवाद होतात. त्यावेळी अनेक सदस्य भान हरपून बोलतात. अपमानजनक शब्द वापरणे योग्य नसते. जगभरातील अनेक देशांच्या संसदेमध्ये आशा अपमान जनक शब्दांवर आक्षेप घेतला जातो. ब्रिटिश संसदेमध्ये ‘स्पीकर’ असे शब्द सदस्याला मागे घ्यायला सांगतात. ही संकल्पना भारतामध्ये ब्रिटनच्या संसदेमधून घेतली आहे. 1604 मध्ये ब्रिटनमध्ये पहिल्यांदा असंसदीय शब्दांवर आक्षेप घेवून ते हटविण्यात आले. त्यामुळे असंदीय शब्दांवर कारवाई करण्याची 418 वर्षांची पंरपरा आहे. इतिहासकार ‘पाॅल सीवार्डने’ यांनी याचा उल्लेख केला आहे. 16 व्या शतकापासून ही पंरपरा सुरु आहे. ब्रिटनच्या हाऊस  ऑफ  काॅमन्समध्ये पहिल्यांदा हा निर्णय घेतला. हीच परंपरा भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅंड, आयरलॅंण्ड आणि कॅनडाच्या संसदेमध्ये पाळली जाते.

भारतीय संविधानामध्ये संसदेमध्ये बोललेल्या व्यक्तव्यावर कोर्टात चॅलेंज देता येत नाही. मात्र असे असले तरी देखील असे शब्द वापरणे योग्य मानले जात नाही. लोकसभा अध्यक्ष अशा शब्दांवर आक्षेप घेवू शकतात. त्यांना तो शब्द मागे घ्यायला लावतात. मराठी, इंग्रजी, हिंदी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये अशा प्रकारचे अनेक असंसदीय शब्द आहेत.यावेळी जारी केलेल्या पुस्तकामध्ये 1100 पान आहेत. लोकसभा, राज्यसभा, विधानसभेसाठी हे शब्द असंसदीय आहेत.अससंदीय शब्दांचे 1999 मध्ये पहिल्यांदा पुस्तक बनवण्यात आले.

हे सुध्दा वाचा:

घटस्फोटाचे कारण बनले ‘मंगळसूत्र’, वाचा सविस्तर…

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

‘ये पब्लिक है ये सब जानती है’, जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर गरजले

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!