29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयनक्की वाचा: 'द्रौपदी टुडू मुर्मू' यांची जीवन कहाणी

नक्की वाचा: ‘द्रौपदी टुडू मुर्मू’ यांची जीवन कहाणी

टीम लय भारी

मुंबईः राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार ‘द्रौपदी मुर्मू’ यांची जिवन कहाणी ‘सुरस’ आणि तितकीच ‘संघर्षमय’ आहे. त्यांचा जन्म ‘उपरवाडा’ गावात झाला. लग्नानंतर त्या ‘पहाडपुरा’मध्ये आल्या. त्या भुवेश्वरमधील मयुरभंज जवळच्या पहाडपुरा गावच्या रहिवासी आहेत. कही वर्षापूर्वी या गावात जाणारा रस्ता कच्चा होता. सगळीकडे दगड धोंडयांचे राज्य होते. शांत अशा डोंगरावर त्यांचे अर्धेपक्के, मातीचे घर होते. मोजकेच कपडे त्यांच्याकडे होते. त्यांची घरची परिस्थती अत्यंत बेताची होती. त्यांचे वडील बकरी पालन करत होते.

द्रौपदी टुडू यांचा ‘प्रेम विवाह’ झाला. त्यांच्या पतीचे नाव ‘शाम चरण मुर्मू’ होते. त्या पहाडपुरच्या सून बनल्या. द्रौपदी मुर्मू यांना लग्नामध्ये हुंडा म्हणून एक गाय, एक बैल, 16 जोडी कपडे दयावे लागले होते. त्यांचे वडील बिरंची नारायण टुडू यांना सुरुवातीला हा विवाह मान्य नव्हता. शाम यांचे काका बासी आणि गावातील दोन तीन माणसं मागणी घालण्यासाठी गेले. त्यानंतर चार दिवसांनी  वडीलांनी हे मान्य केले. 1980 मध्ये त्यांनी  लग्न केले.

नक्की वाचा: 'द्रौपदी टुडू मुर्मू' यांची जीवन कहाणी

 त्यांचे 7 वी पर्यंतचे शिक्षण उपरवाडा गावात झाले. त्याकाळात पदवीचे शिक्षण आदिवासी मुलींमध्ये कोणीही घेतलेले नव्हते. त्या पहिल्या होत्या. 1969 ते 1973 पर्यंत त्यांनी भुवनेश्वरच्या ‘रामा देवी वुमंस काॅलेज’मध्ये शिक्षण घेतले. त्या शिक्षणामध्ये हुशार होत्या. त्याच काळात त्यांची भेट शाम चरण मुर्मू यांच्या बरोबर झाली. राजकारणात येण्यापूर्वी त्या रागरंगपूरमध्ये शिक्षिका होत्या.

 त्यांची बोली भाषा ‘संथाली’ ही आहे. त्यांचा जन्म ‘संथाली समाजा’मध्ये झाला. त्यांच्या विवाहामध्ये लाल पिवळया कोंबडीच्या चिकनची मेजवानी दिली होती. त्यांच्या लग्नाची तारीख कोणच्याही लक्षात नाही. मात्र 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांचा विवाह 18 व्या वर्षी झाला. काही वर्षापूर्वी त्यांचा पतीचे निधन झाले. त्यांच्या दोन्ही मुलांचे निधन झाले. 1984 मध्ये त्यांच्या 3 वर्षांच्या मुलीचे निधन झाले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे निधन झाले. 2013 मध्ये दोन नंबरच्या मुलाचे निधन झाले. तर 2014 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर आपले घर त्यांनी 2016 मध्ये शाळेसाठी दिले.

केवळ 400 मतदारांचे हे गाव आहे. या गावात 100 ते 125 घरे आहेत. या गावात ‘हो’, ‘मुंडा’ आणि ‘संथाल’ या तीन आदिवासी जामातीचे लोक एकत्र राहतात. या जमातीमधील लोक ‘बुढम ठाकुर’ आणि ‘शालीग्राम’ची म्हणजे शाल नावाच ‘झाडाची’ पूजा करतात. बुढवा ठाकुर ‘पिंपळा’च्या झाडावर निवास करतो. सुमारे एक एकर जमिनीमध्ये या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यालाच ते पूजास्थान म्हणतात. नाच गाणे, पूजापाठ करणे ही त्यांची संस्कृती आहे. ‘भात दालमा’ हा त्यांचा पारंपारिक पदार्थ आहे.

हे सुध्दा वाचा:

पावसाच्या पाण्याने घातला विदर्भाला वेढा

साईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान

कोर्टाच्या सूनावणीपूर्वी, शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकरणी जाहीर

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!