29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयनरेंद्र मोदींचा कर्नाटक प्रचारात 'द केरळ स्टोरी' च्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर घणाघात

नरेंद्र मोदींचा कर्नाटक प्रचारात ‘द केरळ स्टोरी’ च्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर घणाघात

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीला फेटाळून लावले आहे. या चित्रपटावरुन रणकंदन सुरु असतानाच या चित्रपटावरुन आता राजकारण देखील तापत चालले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुक प्रचारात या चित्रपटासंबंधीत वक्तव्य केले आहे. हा चित्रपट दहशतवादावर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकात प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दहशतवादी कारवायांवर आधारित आहे. हा चित्रपट दहशतवादाचा भिसुर चेहरा दाखवतो. मात्र काँगेस या चित्रपटाविरोधात असून दहशतवादी प्रवृत्तींसोबत उभी आहे, काँग्रेस व्होट बँकेसाठी दहशतवादाचा बचाव करत असल्याचा आरोप देखील मोदींनी केला.

मोदी म्हणाले, म्हटले जाते की, केरळ स्टोरी हा केवळ एका एका राज्यातील दहशतवादाचा दस्तावेज आहे. केरळ हे प्रतिभावान आणि कष्टाळू लोकांचे राज्य पण याच राज्यात असे षडयंत्र रचले गेले. याचाच खुलासा या चित्रपटातून केला आहे, असे सांगतानाच मोदींनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले दुर्देव पहा काँग्रेस अशा दहशतवादी प्रवृत्तींसोबत असल्याचे दिसून येते. काँग्रेस अशा दहशतवादी विचारसरणीच्या लोकांसोबत मागच्या दाराने राजकीय सौदेबाजी करत आहे. काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

तब्बल 15 वर्षांनंतर आमिर करतोय ‘गजनी’च्या सिक्वेलची तयारी!

IPS अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

मन की बात @100: गैरहजर विद्यार्थ्यांना 100 रूपयांचा दंड?

मोदी म्हणाले, मला आश्चर्य वाटते व्होट बॅंकेसाठी काँग्रेस दहशतवादासमोर झुकत आहे. असा पक्ष कधी कर्नाटकचे संरक्षण करु शकतो? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दहशतीच्या वातावरणाखाली येथील आयटी उद्योग, कृषी क्षेत्रासह सगळेच उद्ध्वस्थ होईल. येथील समृद्ध अशा उद्योग संस्कृतीचा विनाश होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी