29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयभारताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात युवकांना विकसित भारत द्यायचा आहे; गुजरात निवडणुकीनंतर मोदींनी युवावर्गाचे...

भारताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात युवकांना विकसित भारत द्यायचा आहे; गुजरात निवडणुकीनंतर मोदींनी युवावर्गाचे मानले आभार

२०४७ स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव असेल तेव्हा आपल्याला युवकांना विकसित भारत द्यायचा आहे. हे धेय्य ठेऊन वाटचाल करायची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरात निवडणूकीच्या यशानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

2002 नंतर माझ्यावर विरोधकांनी टीका, निंदा केली केली, पण त्यातून मी शिकत गेलो. निंदेतून आपली शक्ती वाढवली पाहिजे कारण आता, विरोधकांकडून अन्याय वाढणार आहे. ते आता जास्त सहन करु शकणार नाहीत. त्यामुळे आपल्याला सहनशक्ती वाढवावी लागणार आहे. आपल्याला सकारात्मक, सेवाभावाचा रस्ता आपल्याला निवडायचा आहे. २०४७ स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव असेल तेव्हा आपल्याला युवकांना विकसित भारत द्यायचा आहे. हे धेय्य ठेऊन वाटचाल करायची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरात निवडणूकीच्या यशानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी मोदी म्हणाले, गुजरात निवडणुकीत असे दिसून आले की, एक कोटीहून अधिक मतदार असे होते की, ज्यांनी काँग्रेसचा काळ कधी पाहिला नव्हता. त्या युवा मतदारांनी केवळ भाजपचाच काळ पाहिला होता. त्यामुळे लक्षात घेतले पाहीजे की युवावर्ग जोखून पारखून मतदान करतो. युवावर्गाने भाजपला मोठ्या संख्येने मतदान केले. त्यामुळे मतांचे रेकॉँर्ड तोडले. याचा अर्थ युवकांनी आमची कामे पाहिली, युवकांना भाजपची विकासाचे राजकारण हवे आहे. युवक जातीपात आणि परिवारवादाविरोधात असल्याचे दिसून आले.

मोदी म्हणाले, जेव्हा कोरोना काळात बिहारमध्ये निवडणूका झाल्या जनतेने  भाजपला आशिर्वाद दिला महामारीनंतर झालेल्या निवडणुकांध्ये देखील भाजपला यश दिले. आता लोकांचा केवळ भाजपवर विश्वास आहे. मी एक्सपर्ट्सना सांगु इच्छितो, विकसीत गुजरता विकसीत भारतचा नारा दिला होता. त्याला मतदारांनी प्रतिसाद दिला. जेव्हा देशासमोर संकट असते तेव्हा जनतेचा भाजपवर भरोसा असतो. देश मोठे लक्ष्य ठेवतो देशवासीयांचा भरोसा भाजपवर असतो. भाजप आज जेथे पोहचला त्यामागे  पाच पाच पिढ्या जनसंघ जमान्यापासून पिढ्या खपल्या आहेत. लाखो कार्यकर्त्यांनी आपले जीवन समर्पण केले आहे. व्यक्तीगत स्वप्नांना तिलांजली देत समाज देशाच्या सशक्तीकरणासाठी दिला. भाजप आपल्या कार्यकर्त्यांवर भरोसा करुन रणनीती बनवतो आणि सफल बनतो. पक्षात चढ उतार आले पण आम्ही आदर्ष आणि मुल्यांवर अढून राहीलो.

मोदी म्हणाले, गेल्या आठ वर्षात देशात कार्य आणि कार्यशैलीत मोठा बदल झाला. भाजपने घर, शौचालय इंटरनेट, भोजन, पाणी, नळ अशा गोष्टींवर यावर लक्ष्य केंद्रीत केले. आधीच्या राजकारणात याकडे लक्ष दिले जात नव्हते. आज आमचे सरकार इमानदारीने प्रयत्न करत आहे. लाभार्थ्यापर्यंत मोबदला पोहचावा म्हणून टेक्नोलॉजीचा वापर करतो, असे सांगतानाच ते म्हणाले की आज तज्ञांचेच मत आहे की, देशात गरीबी कमी होत आहे. गेल्या आठ वर्षात गरीबांना सशक्त करण्याबरोबरच आधुनिक इन्फ्रास्ट्रकचरवर भर दिला आहे. आम्ही केवळ घोषणेसाठी घोषणा करत नाही, आम्ही राष्ट्रनिर्माणाची मोठे लक्ष ठेवले आहे. आमच्या घोषणांमागे दुरगामी लक्ष्य असते. आज देशाचा मतदार जागरुक आहे. काय हिताचे काय हिताचे नाही हे तो जाणतो. शॉर्टकट राजकारणाचे तोटे मतदार जाणतो. आमची राजणीती शॉर्टकट राजकारणाची नाही, असे देखील मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा
VIDEO : गुजरातचा निकाल देशासाठी धोकादायक; लय भारीचे संपादक विक्रांत पाटील यांनी केलेले विश्लेषण

मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लागेल; देवेंद्र फडणवीसांची गुजरातच्या निकालानंतर प्रतिक्रीया

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

यावेळी मोदी म्हणाले कोवळ निवडणुकांच्या राजकारणामुळे कोणाचे भले होऊ शकत नाही. समाजात अंतर पाडून जे पक्ष लाभ घेण्याच्या तयारीत असतात त्यांना आज युवा पिढी पाहत आहे, आणि समजत देखील आहे. कधी भाषा, खानपान, वर्ग अशी लढण्यासाठी अनेक कारणे असू शकतात पण एकत्र येण्यासाठी ‘मातृभुमी’ एवढे एकच कारण पुरेसे आहे. जगण्या मरण्यासाठी हे एक कारण पुरेसे आहे. देश प्रथम हा उद्देश असला पाहिजे, असे देखील ते म्हणाले. आज सर्वांची पसंत भाजप आहे. गुजरात आदिवासींचा देखील भाजपला आशिर्वाद, एससीएसटीच्या देखील जागा भाजपने जिंकल्या, आदिवासींचा भाजपला पाठींबा हा बदलाव देश पाहत आहे. अनेकवर्षे आदिवासीकडे दुर्लक्ष केले भाजपने त्यांच्याकडे लक्ष दिले भाजपने आदिवासी राष्ट्रपती दिला. आर्थिकस्थिती मजबूत केली. आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे म्युझियम बनविले. आदिवासी युवकांचा सन्मान वाढवला, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, आजकाल देशातील माता, भगिनी भाजपवर का विश्वास दाखवतात अशी चर्चा होते. जर कोणी आत्मचिंतन केले तर स्वातंत्र्यानंतर पहिले सरकार जे महिलांचे प्रश्न समजून घेत योजना आखत आहे.  इतर सरकारांच्या तुलनेत भाजपने गेल्या सात आठ वर्षांत अधिक काम केले महिलांसाठी, महिलांचे प्रश्न भाजपसाठी निवडणुकीचे मुद्दे नाहीत. ते भाजपसाठी प्राणतत्व आहेत. महिला सशक्तीकरणासाठी संधी दिली.  येणाऱा काळ आपल्यासर्वांसाठी महत्तवाचा. सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास याभवनेने एकत्र येऊन काम करायचे आहे. मी युवकांचे अभिनंदन करतो जनतेला प्रणाम करतो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी