29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराष्ट्रीययुपीए सरकारचा काळ देशाच्या इतिहासातील 'द लॉस्ट डेकेड'; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार

युपीए सरकारचा काळ देशाच्या इतिहासातील ‘द लॉस्ट डेकेड’; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार

लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी  विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. युपीए सरकारचा २००४ ते २०१४ हा काळ (period of the UPA government) देशाच्या इतिहासातील ‘द लॉस्ट डेकेड’ (The Lost Decade) असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार चर्चेत मोदी बोलत होते. काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, काँमन वेल्थ घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, दहशतवादी हल्ले झाल्याचे सांगत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. (Narendra Modi’s speech in the Lok Sabha, criticism of the opposition)

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले चर्चेमध्ये प्रत्येकाने आपले आकडे मांडले, युक्तीवाद केला. आपल्या आवडी-प्रवृत्तीनुसार मुद्दे मांडले. मात्र त्या गोष्टी समजून घेतल्यास त्यांची योग्यता क्षमता लक्षात येते. काही लोकांना हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे. हार्वर्डमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन हा या अभ्यासाचा विषय आहे, असे सांगत त्यांनी राहूल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी दुष्यंत कुमार यांच्या गझलमधील ‘तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं, या काव्यपंक्ती देखील उद्धृत केल्या.

हे सुद्धा वाचा

अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न; मोदी सरकारची कोंडी!

तुमचे लव्ह मॅरेज झाले, बेरोजगारीमुळे माझे लग्न अडले; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

मोदी म्हणाले, गेली नऊ वर्षे केवळ आरोप केले, कोणीही विश्लेषण केले नाही. निव़डणूक हरल्यानंतर ईव्हीएमवर आरोप, विरोधात निकाल लागल्यास न्यायालयांवर टीका, भ्रष्टाचाराची चौकशी केल्यास तपास यंत्रणांवर आरोप केले जातात. मात्र इडीने सर्वांना एका मंचावर आणले. जे काम मतदार करु शकले नाहीत ते काम इडीने केले असे म्हणत मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. मोदी म्हणाले, १४० कोटी जनतेचे सामर्थ्य आहे. आव्हानांपे्क्षा त्यांचे धैर्य मोठे आहे. त्यांनी कठीण काळात, अनेक देशांमध्ये असलेल्या अस्थिरतेच्या काळात, शेजारील देशात अन्नाचा तुटवडा असतानाच्या काळात भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी