कोरोनामुळे दोन वर्ष संपूर्ण जग थांबलेले असताना ६ सप्टेंबर २०२२ रोजी देशाच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी दिली. आज या ऐतिहासिक घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. भारत बायोटेक कंपनीने या लसीची निर्मिती केली. अशा पद्धतीची पहिली लस भारत बायोटेकने जगभरात पहिल्यांदा तयार केल्याचा दावा केला.
२०२० साली संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीत झुंजत होते. कोरोनामुळे कोट्यावधी लोकांचे प्राण गेले. जगभरात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसी तयार केल्या गेल्या. कोरोनाचे विविध व्हेरिएंट येत राहिले. २०२२ पर्यंत भारताने कोरोनाच्या तीन लाटांचा सामना केला. त्याच दरम्यान भारत बायोटेक या औषध निर्माण कंपनीने या इन्ट्रानेझल लशीची निर्मिती केली. लसीची तिसरी क्लिनिकल चाचणी १५ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण करण्यात आली. भारत बायोटेकने लसीच्या पहिल्या दोन डोस साठी देशभरात १४ ठिकाणी चाचण्या घेतल्या होत्या. नेझल लस बूस्टर डोससाठी देशभरात ९ ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या.
हे ही वाचा
१ डिसेंबरला सेंटर ट्रक स्टॅंडर्ड शॉपिंग मोड कंट्रोल ऑर्गनायझेशनने आणीबाणीच्या परिस्थितीत नाकावाटे लस देण्यास परवानगी दिली. वैद्यकीय तज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, नाकातून दिली जाणारी लस इंजेक्शनपेक्षा अधिक फायदेशीर आहे. लस नाकाद्वारे घेतल्याने नाकात आणि रक्तात प्रथिने बनतात, परिणामी नाकात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. कोरोनाचा विषाणू नाकातून शरीरात प्रवेश करतो. कोरोनाचा शरीरात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल असा दावा भारत बायोटेकने केला.