32 C
Mumbai
Wednesday, March 8, 2023
घरराष्ट्रीयनागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं !

नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये अखेर एनडीपी आणि भाजप युतीच्या अंतर्गत स्थापन होत असलेल्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली असल्याच्या चर्चांना उधानं आलं आहे.

गेल्या काही दिलवसांपासून संपूरे्ण महाराष्ट्राचे लक्ष नागालँडमध्ये स्थापन होत असलेल्या नव्या सरकारवर लागले होते. यामागील प्रमुख कारण होते ते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधात बसणार की भाजपाला साथ देत सरकारमध्ये सामील होणार. या प्रश्नाचा निकाल अखेर लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये अखेर एनडीपी आणि भाजप युतीच्या अंतर्गत स्थापन होत असलेल्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली असल्याच्या चर्चांना उधानं आलं आहे.

नागालँडमध्ये झालेल्या निवडणूकीत एनडीपीपीने 25 जागा तर भाजपने 12 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय लविरोधात असणाऱ्या एकाही पक्षाला दोन आकडी जागा जिंकता आल्या नव्हत्या. विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी कांग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे नागालँडमध्ये सक्षम विरोधी पक्ष तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नागाँडमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नसणार आहे.

हे सुद्धा वाचा

विधिमंडळ हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांचे उत्तर; माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच…

मार्चअखेरपर्यंत ‘ही’ कामे नाही झाली तर बसेल मोठा भुर्दंड

नारी शक्ति तुझे सलाम: ‘आमदार आई’ अहिरेंपाठोपाठ आता नमिता मुंदडाही तान्हुल्यासह कर्तव्यास सज्ज..!

विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 7 जागा जिंकल्या आहेत. पण राष्ट्रवादीने विरोधात बसण्याऐवजी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकून आलेल्या सर्वपक्षीय आमदारांचं सरकार अस्तित्वात येणार आहे.

दरम्यान, नागालँडमध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी चालून आलेली असतानाही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देणं हे अनेकांना आश्चर्याचं वाटत आहे. विशे, म्हणजे भाजपासोबत जाण्यामागे शरद पवार यांची भविष्यासाठीची काही खेळी असेल का ? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवाय नागालँडमध्ये झालेल्या या सरकार स्थापनेचा महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडी आणि खासकरून राष्टरवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संबंधांवर काय फरक पडणार हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी