29 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरराष्ट्रीयMorbi bridge disaster : मोरबी पूल दुर्घटनेत कंपनीच्या अधिकाऱ्यांसह नऊ जणांना अटक

Morbi bridge disaster : मोरबी पूल दुर्घटनेत कंपनीच्या अधिकाऱ्यांसह नऊ जणांना अटक

गुजरातमधील मोरबी येथील मच्छु नदीवरील झुलता पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली होती. या दुर्घटनेत 141 लोकांचा बळी गेला. दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीच सोमवारी या पुलाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या ओरेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह एकुण नऊ जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे.

गुजरातमधील मोरबी येथील मच्छु नदीवरील झुलता पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली होती. या दुर्घटनेत 141 लोकांचा बळी गेला. दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीच सोमवारी या पुलाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या ओरेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह एकुण नऊ जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे. याबाबत पोलीस महानिरिक्षक अशोक यादव यांनी माहिती दिली.अशोक यादव म्हणाले, या सर्वांची कोरोना चाचणी करुन त्यांना अटक केली आहे. तर सुत्रांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेनंतर संबधित कंपनीचे वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी फरार झाले आहेत.

या दुर्घटनेबाबत कंपनीतील अनेक त्रुटींमुळे कंपनीला दोषी मानले जात आहे. ज्यामध्ये फिटनेस सर्टिफिकेट घेण्याबाबत उदासिनता, आणि वेळे आधी पुल वेळे आधीच खुला केला जाण्याची कारणे सांगितली जात आहेत. रविवारी या झुलत्या पूलावर 500 हून अधिक लोक होते. यावेळी अचानक पूल तुटला आणि पुलावरील लोक नदीत कोसळले. या दुर्घटनेत 141 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पुलावर क्षमतेहून अधिक लोकांची गर्दी झाली आणि पुलावर वजन वाढल्यामुळे हा पूल तुटला.

मिळालेल्या माहिती नुसार या पुलावर 100- 150 लोकांची येण्या जाण्याची क्षमता होती. दुर्घटना घडली तेव्हा या पूलावर 5 पट अधिक लोक होते. 100 लोकांची क्षमता असलेल्या पूलावर 400 ते 500 लोक होते. हा पूल साधारण 100 वर्षे जूना होता. त्याची दुरूस्ती आणि पनर्बांधनी केल्यानंतर पाच दिवसांपूर्वीच तो खुला करण्यात आला होता. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. तर दुर्घटनेवेळी तेथे असलेल्या एकाने सांगितले की, दुर्घटना घडली त्यावेळी पूलावर अनेक महिला आणि मुले उपस्थित होती. तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, दुर्घटना घडण्याआधी अनेकजण पुलावर उड्या मारत होते, अनेकजण पुलाच्या केबल खेचत होते. कदाचीत लोकांच्या गर्दीमुळे पुल तूटला असण्याची शक्यता देखील त्या व्यक्तीने व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा :

Rahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे आश्वासन

Indira Gandhi Death Anniversary : इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींचे भावनिक ट्विट

Devendra Fadnavis : माझा एक फोन आणि बच्चु कडू गुवाहाटीत; फडणविसांनी सांगितली अंदरकी बात!
पंतप्रधान झाले व्याकूळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील थराड येथे पाणीपुरवठा तसेच इतर अनेक विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले होते. यावेळी ते अत्यंत भावूक झाले. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मोरबी पूलाच्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांसोबत केंद्र सरकार सोबत आहे. राज्य सरकार देखील युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. पंतप्रधान यावेळी म्हणाले, विकास कामांचे कार्यक्रम होतील न होतील, या दुर्घटनेबद्दल मी खुप व्याकूळ झालो होतो. मात्र तुमची सेवा आणि कर्तव्य पालनाचा संस्कार या कारमामुळे मी आज येथे आलो आहे. मोरबी दुर्घटनेने मी व्यथित झालो आहे. कदाचीत खुपच कमी वेळा आयुष्यात मी अशी पीडा अनुभवली असेन एका बाजूला करुणेने भरलेले पीडित हृदय आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्याचा मार्ग आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!