30 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरराष्ट्रीयमुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते म्हणाले आमचे मंत्रालय पाच ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे बांधत आहे. मुंबई-दिल्ली महामार्गावरुन अवघ्या 12 तासांत प्रवास करता येणार असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातील बरसौता गावात 2443.89 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 204.81 किमी लांबीच्या सात रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील उपस्थित होते.

गडकरी म्हणाले कृषी क्षेत्रासोबत औद्योगिक विकास देखील आवश्यक आहे. म्हणून आमचे सरकार पाच ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे ची उभारणी करत आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे 1,382 किमी लांबीचा असून एक लाख कोटी रुपये खर्चाचा आहे. हा महामार्ग मध्यप्रदेशसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अटल प्रगती महामार्गाचे काम देखील लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या महामार्गासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च येणार असून तो 415 किमी लांबीचा असले, हा महामार्ग युपी, एमपी राजस्थानमधून जाणार असू  मध्यप्रदेशच्या विकासासाठी तो उपयुक्त ठरणार असल्याचे गडकरी म्हणाले.
हे सुद्धा वाचा
सुखविंदर सिंग सुक्खु होणार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री; राज्यात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार मुकेश अग्नीहोत्री
सुषमा अंधारेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्णय

वाढदिवशी किस करुन सेल्फी घेतला, व्हायरल करण्याची धमकी देऊन केले वारंवार अत्याचार

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक मोठी आर्थिक शक्ती बनेल आणि त्यात मध्य प्रदेशचे मोठे योगदान असेल. या पाच द्रुतगती मार्गांजवळ लॉजिस्टिक पार्क आणि औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात यावे. इंदूर ते हैदराबाद असा 687 किमी लांबीचा नवीन सहा पदरी महामार्ग बांधला जाणार आहे, जो 2024 पर्यंत तयार होईल. मुख्यमंत्री चौहान यांच्या मागणीवरून त्यांनी नर्मदा परिक्रमा मार्गाचे सर्व अपूर्ण काम पूर्ण करण्याची घोषणा केली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!