33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराष्ट्रीयOperation Lotus : महाराष्ट्रानंतर आता दिल्लीचे 'केजरीवाल सरकार' भाजपच्या रडारवर

Operation Lotus : महाराष्ट्रानंतर आता दिल्लीचे ‘केजरीवाल सरकार’ भाजपच्या रडारवर

'ऑपरेशन लोटस' ही भाजपची एक मोहिम आहे. ही मोहिम फत्ते करण्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. महाराष्ट्रातील आमदारांना 50 खोक्यांचे आमीष दाखवल्यानंतर आता आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 खोक्यांचे आमीष दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे काल अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केले.

‘ऑपरेशन लोटस’ (Operation Lotus) ही भाजपची एक मोहिम आहे. ही मोहिम फत्ते करण्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. महाराष्ट्रातील आमदारांना 50 खोक्यांचे आमीष दाखवल्यानंतर आता आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 खोक्यांचे आमीष दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे काल अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केले. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने शुक्रवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले होते. द‍िल्ली विधानसभा विधीमंडळात आपच्या आमदारांनी 20 खोक्यांची नारेबाजी केली. शिवसेनेच्या आमदारानंतर आता आम आदमी पार्टीच्या आमदारांना जाळयात ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे भारतातल्या जनतेला कळले आहे. तर विधानसभा उपाध्यक्षांनी मनिष सिसोदीया यांचा राजीनामा माग‍ितला. त्यानंतर विधानसभा तहकूब करण्यात आली.

त्यानंतर म.गांधीजींच्या पुतळयाजवळ आम आदमी पार्टीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी मनिष सिसोदिया म्हणाले की, आपल्या देशात जो कोणी चांगले काम करतो, त्यांना तपास यंत्रणांचा सामना करावा लागतो. कारण त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असुरक्षीत वाटू लागते.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

Badminton World Championship : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची कमाल, नवा इतिहास रचण्याची

शक्यचा

Google : भारतातील ‘ऑनलाईन’ सुरक्षेसाठी गुगल झाले सज्ज

आमदारांनी मनीष स‍िसोदीया यांच्या विरोधात दारु धोरणावरुन नारेबाजी केली. त्यावेळी भाजपच्या आमदारांच्या हातामध्ये दारुच्या बाटल्या देखील होत्या. आता ऑपरेशन लोटस विरोधी अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली होती.

या बैठकीमध्ये 9 आमदार हजर नव्हते. त्यामुळे या विषयाच्या संशयात वाढ झाली. तर 19 ऑगस्टला मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली होती. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सिसोद‍ियांना आम आदमी पार्टी तोडण्याची ऑफर भाजपने दिली आहे. तुम्ही पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू असे सिसोदियांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील घटनांप्रमाणे दिल्लीत भाजपने प्रयोग सुरु केला आहे. मात्र सिसोदिया म्हणाले, मरेन परंतु केजरीवाल यांच्या बरोबर गद्दारी करणार नाही.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी