29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयउडिसा रेल्वे अपघातानंतर रुळावर सापडली उत्कट प्रेम कवितांची वही

उडिसा रेल्वे अपघातानंतर रुळावर सापडली उत्कट प्रेम कवितांची वही

ओडिसामध्ये रेल्वेच्या तिहेरी अपघाताची अत्यंत दुर्देवी घटना शुक्रवारी झाले. अपघातानंतर तेथील दृष्य काळीज पिळवटून काढणारे होते. प्रवाशांचे मृतदेह, जखमींचे धायमोकलून रडणे या सगळ्यांनी मन सुन्न करुन टाकले होते. अपघातानंतर रेल्वे रुळावर प्रवाशांचे साहित्य इतस्ततः पडलेले होते. यात कुणाच्या तरी काळजाच्या कोपऱ्यात जपलेल्या प्रेमाची एक प्रेम कवितेची वही देखील होती, असंख्य स्वप्ने उरी असणारी ही प्रेम कहाणी कदाचीत अधूरी राहिली म्हणावी की, ती प्रेम कविता लिहीणारी व्यक्ती या भयंकर अपघातात वाचली हे कळायला अद्याप मार्ग नाही.

बालासोर येथील या दुर्घटनेनंतर तेथील रेल्वे रुळावर एक प्रेम कवितेची वही सापडली असून या वहीमध्ये लाल, हिरव्या, जांभळ्या रंगात हस्तलिखीत प्रेम कविता लिहीलेल्या आहेत. बंगाली भाषेतील या अंत्यत उत्कट प्रेम कविता लिहीणारी व्यक्ती मात्र अद्याप सापडली नाही, या दुर्घटनेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला की तो बचावला हे कळायला मार्ग नाही.
ओल्पो ओल्पो मेघ थेके बृष्टी सृष्टी होई, छोट्टो छोट्टो गोल्पो थेके भालोबाशा सृष्टी होई अर्थात (छोटे छोटे मेघ पाऊस निर्माण करतात, छोट्या छोट्या कथा प्रेम निर्माण करतात)

अपघातानंतर रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या एका बॅगेत ही प्रेम कवितेची वही सापडली असून त्या वहीत ज्या कोणी कवीने या कविता लिहीलेल्या आहेत. त्याचे नाव मात्र कुठेच लिहिलेले नाहीत. या कवितेत ज्या व्याकुळपणे कविने कविता लिहीलेल्या आहेत, त्याचा देखील कुणाचा उल्लेख यामध्ये नाही. उधाणलेल्या सागराच्या उंच खोल लाटा जशा आदळत असतात, तसे प्रेमाचे अंतरबाह्य घुसळणे कवीने या प्रेम कवितेतून मांडलेले आहे.

हे सुध्दा वाचा

जबरा फॅन ! धोनीच्या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवर छापला फोटो

सोनियासमोर नाक घासलं, आठवत नाही का ?, संजय राऊतांवर नरेश म्हस्के यांनी सोडला बाण !

नोकरीची संधी !!! इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये दहावी/बारावीसाठी अप्रेंटिस भरती

मात्र ज्या कुणी प्रेम कविता लिहिल्या आहेत तो या अपघातातून बचावला आहे, की त्याचा दुर्देवी अंत झाला आहे, हे मात्र कुणालाच माहिती नाही. रेल्वे रुळावर पडलेल्या या प्रेम कवितेच्या वहीकडे ही अर्ध्यावरती डाव मोडलेल्या प्रेम कहाणीची शोकांतिका तर नसावी ना? असा मनाला चटका लागून जातो. रेल्वे रुळावर पडलेल्या बॅगा, साहित्य, चपलांचे ढीग, रक्ताने माखलेले कपडे आणि त्यातच प्रेमाचे उत्कट भाव व्यक्त करणारी कवितेची वही पाहून मन विषण्ण करणारे दृष्य समोर उभे राहते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी