33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयPakistan : चुकून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाला भारतीय जवानांनी सुरक्ष‍ितपणे परत पाठवले

Pakistan : चुकून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाला भारतीय जवानांनी सुरक्ष‍ितपणे परत पाठवले

बीएसएफ ने गुरुवारी रात्री रस्ता चुकून भारतात आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला परत पाठवले. एक पाकिस्तानी नागर‍िक सीमा माहित नसल्यामुळे चुकून भारताच्या सीमेवर आला. त्यावेळी सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी चौकशी करु‍न त्याची तपासणी करुन त्याला परत पाठवले.

भारत स्वतंत्र झाला. ही गोष्ट चांगली झाली. मात्र ब्रिटीशांनी भारतातून जातांना भारतापासून पाकिस्तान (Pakistan) वेगळा केला आणि कायमची शत्रूत्वाची आग तेवत ठेवली. भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी देखील भारत पाकिस्तान सीमा वाद सुरुच आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सामान्य नागरिकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. चुकून दोन्ही देशांमधील नागरिक अनेकदा सीमा ओलांडतात. त्यावेळी त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागताे. बीएसएफ ने गुरुवारी रात्री रस्ता चुकून भारतात आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला परत पाठवले. एक पाकिस्तानी नागर‍िक सीमा माहित नसल्यामुळे चुकून भारताच्या सीमेवर आला. त्यावेळी सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी चौकशी करु‍न त्याची तपासणी करुन त्याला परत पाठवले.

त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे संशयास्पद काहीही आढळून आले नाही. तो पाकिस्तानी माणूस बहावलनगरचा राहणारा होता. तो रात्री चुकून सीमेवरील रेणूका चौकी जवळ असलेल्या तारेच्या कुंपणापर्यंत आला. त्याचे नाव विचारले असता अहमद खान यांचा मुलगा मोहम्मद रशिद असल्याचे सांगितले. तो पाकिस्तानच्या बहावलनगर जिल्हयातील सादिकगंज तहसिलचा परिसरातीली हेमावाली येथे राहणारा आहे. त्याने सांग‍ितले की, तो पाकिस्तानमध्ये मोलमजूरी करतो. त्याच्याकडे संशयास्पद अशी कोणतही वस्तू मिळाली नाही.

त्यामुळे भारतीय बीएसफनं पाकिस्तानी रेंजर्सना संपर्क केला आणि माणुसकीच्या नात्याने त्याला पाकिस्तानमध्ये सोडण्यास मदत केली. चुकून तो तारेच्या जवळ आला. श्रीगंगानगरच्या जवळ पाकिस्तानच्या सीमेवर बहावलनगर आहे. भारतीय सीमेच्या तारबंदीपासून काही अंतरावर आलेला भाग हा भारतीय भूभाग आहे. बहावलनगर हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एक जिल्हा आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शिवसेनेतून आणखी आमदार, खासदार नेण्याचा सूचक इशारा

Maharashtra Sea : महाराष्ट्राचा समुद्र किनारा सुरक्षित आहे का ?

Manish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

भारत पाकिस्तान सीमावाद हा जगातील सर्वांत जटील असा सीमावाद आहे. भारत पाकिस्तान सीमेची लांबी सुमारे 2,900 किमी आहे. भारतातील तीन राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशातून ही सीमा जाते. पंजाबमधून 547 किमी, राजस्थानमधून 1,035 किमी, गुजरातमधून 512 किमी आणि जम्मू आणि काश्मीरीमधून 1,216 किमी अंतर भारत पाकिस्तान सीमेने व्यापले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी