ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मश्री सन्मान स्वीकारला. (Patrakar Ramesh Patange PadmaShri)
रमेश पतंगे हे हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाबरोबरच मध्यप्रदेश शासनानेही राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.
संघ विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ती ठामपणे विविध लेखांतून, भाषणांतून आणि पुस्तकातून मांडणारे रमेश पतंगे यांनी आतापर्यंत लहान-मोठया 60 पुस्तकांचे लेखन केले आहे. संविधान या विषयावरील “आम्ही आणि आमचे संविधान” व “स – संविधानाचा” ही त्यांची दोनही पुस्तके खपाचा विक्रम करणारी झालेली आहेत. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत संविधान संकल्पनेचा परिचय त्यांनी करून दिला आहे.
Patrakar Ramesh Patange PadmaShri, रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, Ramesh Patange PadmaShri Sanman, Saptahik Vivek Sampadak ,