28 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरराष्ट्रीयसंसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल,अधिवेशनापूर्वी मोदींनी केले सूचक व्यक्तव्य!

संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल,अधिवेशनापूर्वी मोदींनी केले सूचक व्यक्तव्य!

आजपासून सोमवार, (18 सप्टेंबर) संसदेचे विशेष अधिवेशन होणार असून शुक्रवार, (22 सप्टेंबर) पर्यंत पाच दिवस हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचा पहिलं दिवस संसदेच्या जुन्या इमारतीत भरवला जाणार असून उद्या संसद भवनाच्या नवीन इमारतीत संसदेचे कामकाज चालू होईल. मंगळवारी, (19 सप्टेंबर) जुन्या सांसद भवन परिसरात सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदार यांचे विशेष फोटोसेशन होणार असून त्यानंतर ते नव्या संसद भावनांच्या इमारतीत प्रवेश करतील. यावेळी खासदारांची एक बैठक होणार असून बुधवार, (20 सप्टेंबर) पासून कामकाजला सुरुवात होईल.

यावेळी, अधिवेशानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन संबोधित केले. सर्व खासदारांनी संसदेच्या या विशेष अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

संसदेचे हे विशेष अधिवेशन छोटं असले तरी खूप महत्वाचे आहे. संसदेचं अधिवेशन नव्या ठिकाणी होणार असून भारताला 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे. त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय या नव्या संसद भवनात घेतले जाणार आहेत. हे अधिवेशन अनेक प्रकारे महत्त्वाचं असून सर्व खासदारांनी या विशेष अधिवेशनातील कामकाजात जास्तीत जास्त भाग घ्यावा असं आवाहन मी खासदारांना करत आहे. जीवनात काही क्षण असे येतात की ज्यामुळे उत्साह वाढत असतो. त्यामुळे आता सर्व वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत जाऊया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडतात हे पदार्थ..

मविआ सरकारची कामगिरी भाजप सरकारपेक्षा चांगली; नाना पाटोलेंनी दाखवला प्रूफ

मराठवाड्यातील जनतेसाठी सरकारची ४५ हजार कोटींची मोठी गिफ्ट

चंद्रावर तिरंगा फडकत असून तिथलं शिवशक्ती पॉईंट हा आपल्या प्रेरणेचं केंद्र आहे. जी-20 परिषदही यशस्वी पार पडली असून अनेक संधी आणि शक्यता आपल्यासमोर निर्माण झाल्या आहेत. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला आहे. संसदेचे हे विशेष अधिवेशन छोटं असले तरीही काळाच्या हिशोबाने अधिक मोठे आहे. 75 वर्षाचा हा आपल्या देशाचा प्रवास आता नव्या मुक्कामातून सुरू होत आहे. संसदेचे हे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल, असं सूचक व्यक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी