पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर गोरगरिबांसाठी बॅँकेत खाते उघडण्यासाठी जनधन योजना (PMJDY) अंमलात आणली होती. आज या योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्यदिनादिवशी या योजनेची लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती. गोरगरिंबाची आर्थिक दुष्टचक्रातून सुटका व्हावी या उद्देशाने ही योजना लागू करत असल्याचे मोदी म्हणाले होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जनधन योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त म्हटले आहे की, जनधन योजनेतून 50 कोटींहून अधिक लोकांना अधिकृतपणे बॅँकिग व्यवस्थेत आणले आहे. यापैकी 55.5 टक्के खाती महिलांची आहेत. या योजनेतून ग्रामिण आणि निमशहरी भागात 67 टक्के खाती उघडण्यात आली.
जनधन खात्यांमधील एकूण ठेवी 2 लाख कोटी रुपयांहून अधिक झाल्या आहेत. याशिवाय 2 लाख रुपयांचे अपघाच विमा संरक्षण देणारी जवळपास 34 कोटी रुपे कार्ड देखील कोणतेही शुल्क न लावता प्रदान करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा
नीरजच्या सुवर्ण कामगिरीवर आनंद महिंद्राची ट्विटर पोस्ट चर्चेत
ड्रीम गर्ल 2 ला तरुणाई भुलली; तीन दिवसांत कमावले 40 कोटी
Exclusive: दांडग्या मलईदार पदावर ‘विद्वान’ अधिकाऱ्याची नियुक्ती!
निर्मला सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार सर्व भागधारक, बॅँका, विमा कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे देशातील आर्थिक समावेशनाची परिस्थिती बदलत असून मोदी जनधन योजना एक एतिहासिक उपक्रम म्हणून उदयास आला आहे.
जन धन दर्शक अॅप (JDP) हे एक मोबाइल अॅप्लिकेशन सरकारने लॉन्च केले आहे, या अॅपमुळे बँकेच्या शाखा, एटीएम, बँकिंग प्रतिनिधी (बीसी), भारतीय पोस्ट पेमेंट बँक सारखी ठिकाणे शोधण्यासाठी मदत होते. या अॅपवर 13 लाखांहून अधिक बँकिंग टचपॉइंट अंतर्भूत केले आहेत. http://findmybank.gov.in. या लिंकवर या अॅप्लिकेशनची वेब आवृत्ती नागरिक पाहू शकतात. तसेच 5 किलोमीटरच्या परिघात अद्यापही बँक शाखा नसलेली गावे ओळखण्यासाठी देखील या अॅपचा वापर केला जात आहे. या प्रयत्नांमुळे अद्याप बँक शाखा नसलेल्या गावांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जुलै 2023 पर्यंत, या अॅपवर एकूण 6.01 लाख गावे टाकण्यात आली आहेत. या पैकी 5,99,468 (99.7%) गावांमध्ये बँकिंग आउटलेट उपलब्ध करून दिले आहेत.
या पुढे जनधन खाते धारकांना सरकार या सोईसुविधा पुरविण्याच्या तयारीत
जन धन खातेधारकांना सूक्ष्म विमा योजनांतर्गत संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या पात्र खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने (PMSBY) अंतर्गत विमासंरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. देशभरात जन धन खातेधारकांमध्ये रुपे डेबिट कार्डच्या वापरासह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच सूक्ष्म-कर्ज आणि सूक्ष्म-गुंतवणुकी सारख्या, ठेवींचे हप्ते खातेधारकाच्या सोयीनुसार भरण्याच्या सुविधा, प्रधानमंत्री जनधन योजने मधील खातेधारकांना उपलब्ध करून देण्यात येतील.