दिल्लीतील प्रगती मैदानावर 9 आणि 10 तारखेला जी 20 बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या रात्रीच्या जेवनासाठी राष्ट्रपती भवनकडून निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असून त्यावर प्रेसिंडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम नरेश यांनी याबद्दल सोशल मीडिया साईट एक्स (ट्विटर)वर म्हटले आहे की, निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहीले आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमानुसार इंडिया म्हणजे भारत जो राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे, मात्र आता संघराज्यावरच हल्ला होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
So the news is indeed true.
Rashtrapati Bhawan has sent out an invite for a G20 dinner on Sept 9th in the name of ‘President of Bharat’ instead of the usual ‘President of India’.
Now, Article 1 in the Constitution can read: “Bharat, that was India, shall be a Union of States.”…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023
केंद्रातील मोदी सरकार आता राज्यघटनेतून इंडिया हा शब्द हटविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार हा प्रस्ताव मांडू शकते अशी शक्यता विरोधक वर्तवित आहेत. मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले असून या अधिवेशनात कोणती चर्चा होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एक देश एक निवडणुक, महिलांबाबत विशेष बिल, इंडिया ऐवजी भारत आदी विषयांवर हे अधिवेशन होऊ शकते असा कयास बांधला जात आहे, दरम्यान राष्ट्रपतींकडून पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता अधिवेशनात मोदी सरकार इंडिया शब्द राज्यघटनेतून हटविण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तक उपलब्ध नाही; विद्यापीठांची होणार धावपळ
युझी गेला बागेश्वर बाबाच्या चरणी आणि झाला टीममधून पत्ता कट!
एक फुल, दोन हाफने लाठीचार्जचे खापर पोलिसांवर फोडले
तर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी देखील भाजपवर टीका केली आहे, ते म्हणाले सरकार बाबासाहेब आंबेडकर यांचा एवढा व्देष का करत आहे, आंबेडकांनी लिहीलेल्या संविधानानुसार ”इंडिया म्हणजे भारत” मात्र भाजप सरकार आणि आरएसएस संविधान बदलू पाहत आहेत.