30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदी करणार नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी लोकार्पण

पंतप्रधान मोदी करणार नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी लोकार्पण

नव्या संसद भवनाच्या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी करणार आहेत. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि पंतप्रधानांना संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. लोसभा सचिवालयाच्या माहितीनुसार नव्या संसद भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतिक आहे.

नवे संसद भवन चार मजली असून या इमारतीमध्ये मंत्री आणि पक्ष कार्यालयाबरोबरच प्रत्येक खासदारासाठी कार्यालयाची स्वतंत्र खोली असणार आहे. जुन्या संसद भवनापेक्षा नव्या संसदेचे स्वरुप भव्य असे आहे. या संसद भवनाचे कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेचे डिझाइन एनआयएफटीने केलेले आहे. नवे संसद भवन सेंट्रल विस्टा पुनर्विकासाचा एक हिस्सा आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत तीन किलोमीटर रस्त्यांचे पुनर्बांधणी, एक केंद्रीय सचिवालय, पंतप्रधानासाठी नवे कार्यालय आणि निवास अशा इमारतींची निर्मिती या योजनेव्दारे केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

IAS टीना डाबी यांच्यावर कारवाई होणार; विस्तापित पाकिस्तानी हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी अडचणी वाढल्या

मैत्रिणीला मिठीत घेतले, मग गोळ्या झाडून केली हत्या; स्वत:ही केली आत्महत्या

…म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचे कोटी कोटी आभार

पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 2020 मध्ये नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी कोनशिलेचे अनावरण केले होते. संसदेची नवी अध्ययावत इमारत टाटा प्रोजेक्ट लिमिटेडव्दारे उभारली आहे. या इमारतीत भारतीय लोकशाहीचा वारसा दाखविणारे भव्य संविधान कक्, संसद सदस्यांसाठी एक लाऊंज, ग्रंथालय, समिती कक्ष, भोजन कक्ष, पार्किंग, आदि अनेक सोईसुविधा असणार आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या इमारतीचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी