25 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्बेत खालावली; रुग्णालयात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्बेत खालावली; रुग्णालयात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी  (Heeraben Modi) यांची तब्बेत ठिक नसल्याने त्यांना अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital, Ahmedabad) दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णालयातने जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या आई हीराबेन 18 जून रोजी 100 वर्षांच्या झाल्या. त्यावेळी पंतप्रधान मोदी गांधीनगर येथील त्यांच्या आईच्या घरी गेले होते. पंतप्रधानांनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईला समर्पित ब्लॉग देखील लिहिला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदींनी त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान काल नरेंद्र मोदी यांचे छोटे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कारला देखील मंगळवारी (दि.२७) रोजी कर्नाटकातील म्हैसूरजवळ अपघात झाला होता. यावेळी त्यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, सुन आणि नातू देखील होते. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर त्यांच्या नातवाला पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याला तेथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल दुपारी ते बांदीपुरा येथे जात असताना त्यांच्या कारची दुभाजकाला धडक बसून अपघात झाला, यावेळी कारची वेगमर्यादा निर्धारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा
भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे फडणवीसांना जड जात आहे – संजय राऊत

लोढा वर्ल्ड वन लटकली; आता ब्रिटनमधील कंपनी मुंबईत उभारणार देशातील सर्वात उंच इमारत !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांची तब्बेत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने आपल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे. तर पंतप्रधान मोदी देखील त्यांच्या आईला भेटण्यासाठी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या रुग्णालय परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!