31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदींचा झारखंड दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झारखंड दौरा

टीम लय भारी

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देवघर विमानतळाचे उध्दाटन केले. या विमानतळामुळे झारखंडचा विकास होण्यास मदत होणार आहे. झारखंडच्या जनतेला व्यवसाय मिळणार आहे. बेरोजगारांना काम मिळणार आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

विमानतळ उदघाटनानंतर पंतप्रधान मोदींनी एम्स रुग्णालयाचे उध्दाटन केले. हे रुग्णालय 250 खाटांनी सुसज्य करण्यात आले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैधनाथधामला भेट दिली. यावेळी त्यांनी बैधनाथांची पूजा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवघर महाविदयालयात सभा घेतली. आज त्यांनी कालीमातेची देखील पूजा केली.

केंद्रीय दळणवळण मंत्री सिंधिया यांनी या विमानतळाचा लाखो श्रध्दाळूंना फायदा होईल असे म्हटले आहे. पूर्वी मोठया शहरांमध्ये विमानतळ बनत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची परिभाषा बदलली.ज्यातिरादित्य सिंधीया देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यापूर्वी त्यांनी व्टिटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. ‘देवघरच्या हवेमध्ये आज वेगळा सुगंध आहे. बैधनाथ बाबांच्या पावन धरतीला शतशः नमन‘.

देवघर, पटना, दिल्ली तसेच देवघर रांची कोलकाता अशी विमानसेवा लवकरच सुरु होईल.मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, झारखंडसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. केंद्राच्या मदतीने झारखंडचा विकास होत आहे. झारखंडच्या नागरिकांमध्ये या विमानतळाच्या उध्दाटनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले

हे सुध्दा वाचा:

स्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !

राजनाथ सिंह ‘सलाम वालेकूम‘ का म्हणाले?

सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दीड महिना बंद राहणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी