25 C
Mumbai
Wednesday, March 22, 2023
घरराष्ट्रीयमुख्यमंत्र्यांच्या हेलीपॅडजवळ आढळला जिवंत बॉम्ब

मुख्यमंत्र्यांच्या हेलीपॅडजवळ आढळला जिवंत बॉम्ब

पंजाबमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री ( Punjab Chief Minister) भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्या चंदीगडमधील सेक्टर दोन येथील राजिंदरा पार्क येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलीपॅडजवळ एक जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा बॉम्ब (Bomb) एका फायबरच्या ड्रममध्ये ठेवला होता. तर त्या ड्रमच्या आजूबाजूला वाळूने भरलेल्या पिशव्या ठेवल्या होत्या. चंडी मंदीर आर्मीला या प्रकरणाची माहिती दिली असून येथे तातडीने जवान दाखल झाले आहेत. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ज्या ठिकाणी हा जिवंत बॉम्ब आढळून आला त्या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान केवळ दोन किलोमीटर दूर आहे. नागरी संरक्षण नोडल अधिकारी कुलदीप कोहली यांनी जिंवत बॉम्ब मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळापासून काही अंतरावरच मुख्यमंत्र्यांचे हेलीपॅड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चुक झाल्याचे मानले जात आहे. तर घटनास्थळापासून जवळच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे देखील निवासस्थान आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. एका पादचाऱ्याला हा बॉम्ब आढळून आला. या ठिकाणाहून सीआरपीएफ जवानांचा कॅंप देखील केवळ २०० मीटर अंतरावरच आहे. तर जिथे हा बॉम्ब आढळून आला त्या ठिकाणी केवळ पायीच जाता येते येथे त्यामुळे अशा ठिकाणी बॉम्ब आला कसा याचा तपास केला जात आहे.

हे सुद्धा वाचा 

मुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

नव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

क्लास वन अधिकारी कल्याणकारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; आजपासून सामूहिक रजेवर, सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांच्या कृषि महोत्सवावर बहिष्कार

मिळालेल्या माहितीनुसार एका पादचाऱ्याला हा बॉम्ब आढळून आल्यानंतर त्याने ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तेथे असणाऱ्या जवानांनी ताबडतोब ड्रमजवळ वाळूने भरलेल्या गोण्या ठेवल्या आणि बॉम्ब विरोधी पथकाला पाचारण केले. दरम्यान या घटनेची खबरदारी घेत संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी