31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरराष्ट्रीयराहुल गांधींना अदानी पावला...

राहुल गांधींना अदानी पावला…

अदानीबाबत हिंडेनबर्गने मागील काही महिन्यांपूर्वी खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर मोठा राजकीय गजहब उडाला होता. या प्रकरणी राहूल गांधी यांनी संसदेत अदानी आणि मोदींचा फोटो दाखवून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेससह विरोधी पक्षांनी जेपीसी चौकशीची मागणी लावून धरली होती. आज अदानी शेअरप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला. दरम्या राहूल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आहेत यावेळी त्यांनी अदानींच्या या प्रकरणाचा उल्लेख करत मोदींवर निशाणा साधत जेपीसी चौकशीची मागणी केली. त्यामुळे राजकीय आरोपप्रत्यारोपात राहुल गांधींना आज आयताच मुद्दा मिळाल्याने अदानी राहूल गांधींना पावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राहूल गांधी यांनी अदानी प्रकरणी तीन जागतिक वृत्तपत्राचा दाखला देत अदानी आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदी आणि अदानी यांच्या संबंधांबाबत गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी कुटुंबाने आपल्याच कंपनीच्या शेअर्समध्ये स्वत:चे पैसे गुंतवून गैरव्यवहार केल्याच्या बातम्या आज माध्यमांमध्ये आल्या. माध्यमांमधील बातम्यांचा उल्लेख करत राहूल गांधी यांनी आज अदानींना निशणा करत मोदींवर देखील हल्लाबोल केला.

हे सुद्धा वाचा 
‘मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार का ?’ याच मुद्द्यावरून निवडणुकीत समोर या, भाजपचे उद्धव ठाकरेंना आव्हान
बायकोच्या मानलेल्या भावावर आला ‘तसला’ संशय; अल्पवयीन मुलाची हत्या करुन घरातच लपविला मृतदेह
मंत्रालयाजवळ स्फोट! काही दगड आदळले, खिडक्यांच्या काचा फुटल्या

अदानी गैरव्यवहार हा एका पक्षाचा मुद्दा नसुन तो राष्ट्रीय प्रश्न आहे, या प्रकरणी नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जेपीसीव्दारे चौकशी करावी असे राहूल गांधी यावेळी म्हणाले. अदानीच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे. अदानींच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर्स देशाबाहेर गेले. ते पून्हा कंपनीत गुंतविलेच नाहीत. त्याच पैशातून अदानी विमानतळांसह इतर प्रकल्पात पैसे गुंतवित असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला. या सगळ्या प्रकरणाची ईडी, सीबीआय का चौकशी करत नाहीत असा सवाल उपस्थित करत मोदी यावर गप्प का असा प्रश्न राहूल गांधींनी उपस्थित केला.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी