29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयIndira Gandhi Death Anniversary : इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींचे भावनिक ट्विट

Indira Gandhi Death Anniversary : इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींचे भावनिक ट्विट

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसने सोमवारी (ता. 31 ऑक्टोबर) त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधी यांनी त्यांच्या आजीला अर्थात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Indira Gandhi Death Anniversary) काँग्रेसने सोमवारी (ता. 31 ऑक्टोबर) त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी यांनी त्यांच्या आजीला अर्थात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी अभिवादन केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवरून माजी महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘आजी मी तुझे प्रेम आणि मूल्ये आपल्या हृदयात ठेवून आहे आणि ज्या भारतासाठी तू तुझे सर्वस्व दिले, त्या भारताची पडझड होऊ देणार नाही.’ त्याचवेळी सोनिया गांधी यांनीही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली.

राज्यभरातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात अली. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी दिल्ली येथील शक्तीस्थळावर इंदिरा गांधींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील हिंदीमध्ये एक ट्विट केले आहे. या हिंदीतील ट्विटमध्ये खर्गे म्हणाले की, ‘भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांना त्यांच्या हुतात्मा दिनानिमित्त माझी श्रद्धांजली. शेती असो, अर्थव्यवस्था असो किंवा लष्करी शक्ती असो, भारताला मजबूत राष्ट्र बनवण्यात इंदिराजींचे योगदान अतुलनीय आहे.’

राहुल गांधी यांनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आजी, मी तुमचे प्रेम आणि संस्कार दोन्ही माझ्या हृदयात जपत आहे. ज्या भारतासाठी तुम्ही आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या भारताला मी पडू देणार नाही.’ यासोबतच राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

तसेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, ‘बांगलादेशच्या मुक्तीपासून ते हरित क्रांतीच्या सुरुवातीपर्यंत इंदिरा गांधींनी देशाचे उच्च आणि नीचतेतून नेतृत्व केले. आम्ही देशाच्या विकासासाठी त्यांच्या अटल लवचिकतेला आणि अटूट दूरदृष्टीला सलाम करतो,’ असे काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे. 1984 मध्ये याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन सुरक्षा रक्षकांनी हत्या केली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात एकच खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

BMC : मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत भाजप 25 वर्षे सत्तेत होता; मग चौकशीही 25 वर्षांची करा; काँग्रेस नेत्याचे आव्हान

Devendra Fadnavis : माझा एक फोन आणि बच्चु कडू गुवाहाटीत; फडणविसांनी सांगितली अंदरकी बात!

Gujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप सरकारने 5 दिवसांत पाण्यात घातला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी