22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरराष्ट्रीयRailway New Rule : आता विनातिकीट रेल्वे प्रवासात टीसी रोखू शकणार नाही!...

Railway New Rule : आता विनातिकीट रेल्वे प्रवासात टीसी रोखू शकणार नाही! वाचा काय सांगतोय नवा नियम

जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आरक्षण नियमांशिवायही प्रवास करू शकता.

अनेकजण भारतीय रेल्वेने वारंवार प्रवास करत असतात. रस्ते वाहतुक टाळण्यासाठी सुखाचा आणि सोयिस्कर पर्य्र म्हणून भारतीय रेल्वे वाहुतकीची ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे लांबच्या टप्प्याचा प्रवास देखील अगदी आरामात आणि कमी खर्चात करण्यासाठी रेल्वेचा पर्याय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतो. त्यामुळेच तुम्ही जर अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. जर तुम्हाला अचानक ट्रेनने प्रवास करावा लागला तर तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आरक्षण नियमांशिवायही प्रवास करू शकता.

नवीन नियम काय आहे
रेल्वेच्या नियमांनुसार, यापूर्वी रेल्वेमध्ये बस तत्काळ तिकीट बुकिंग नियमांचा पर्याय होता. पण त्यातही तिकीट काढण्याची गरज नाही. समजा तुमचे आरक्षण नसेल आणि तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचे असेल तर तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. ट्रेनमधील तिकीट तपासक (TTE) कडे जाऊन तुम्ही तुमचे तिकीट काढू शकता. मग TTE तुम्हाला गंतव्यस्थान विचारेल, आणि तिथपर्यंत तिकीट करेल. तसेच तुम्ही कार्डद्वारे TTE पे करू शकता.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

Virat Kohli Birthday Special : फॉर्म इज टेम्पररी, ‘विराट’ इज पर्मनंट

First Indian Voter Death : भारताच्या पहिल्या मतदाराचे झाले निधन

TTE तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही
ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास टीटीई तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास नकार देऊ शकते. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंडासह, प्रवासाचे एकूण भाडे भरून तिकीट काढावे.

प्लॅटफॉर्म तिकिटाने प्रवास करा
प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. तसेच, प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागेल. भाडे आकारताना, निर्गमन स्टेशन देखील तेच स्थानक मानले जाईल.

दरम्यान, या नियमाच्या आधारे अगदी अडचणीच्या काळात तातडीचा प्रवास करणे सामान्य नागरिकांना सुखाचे होणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र, या नाियमाचा गैरफायदा घेत अनेकजण विनातिकीट प्रवास करण्याच्या रप्रयत्नात असल्याचे देखील पाहायला मिळू शकते. अशा परिस्थितीत निर्गामन स्थानकाच्या पुढे गेल्यानंतचर जर प्रवाशाकडे तिकीट नसेल तर त्याला नियमाप्रमाणे दंड भरणे आवश्यक असेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!