31 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी

बुधवारी रक्षाबंधनानिमित्ताने चैतन्याचे वातावरण होते. दिल्ली येथील शाळकरी मुलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. शाळकरी विद्यार्थ्यांनींचे पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले.काही विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली राखी बांधली. प्राथमिकपासून माध्यमिक वर्गातील शाळकरी मुलींनी मोदींना राखी बांधली.

रक्षाबंधनानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना पंडितांनी महिलांना ठराविक मुहूर्ताच्या वेळेत भावांना राखी बांधण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी 30 ऑगस्ट रोजी भद्रा योग असल्याने ठराविक मुहूर्ताच्या काळातच बहिणींनी भावाला राखी बांधावी, असा सल्ला पंडितांनी दिला आहे. भद्रा योग राखी बंधनासाठी अशुभ असतो, अशी धारणा आहे.
रक्षाबंधन 30 ऑगस्ट रोजी बुधवारी साजरी करण्याबद्दलही बराच गोंधळ आहे. बुधवारी पूर्णिमा तिथी असल्याने दिवसभर भद्र योग आहे. बरेच का होलिका दहन आणि रक्षाबंधनाच्या दिनी भद्रा वेळ असते.

हे सुद्धा वाचा 
चीनचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर पुन्हा दावा; सीमाप्रश्न पुन्हा चिघळणार

गदर 2 मध्ये सनी देओलच्या ऐवजी गोविंदाला मिळणार होता रोल?

रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने वाचवला भावाचा जीव; नवी मुंबईत अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन!

होलिका ध्यानाच्या वेळी भद्रा वेळ असेल तर होलिका दहन पुढे ढकलली जाते. यंदा श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेत भद्रा योग असल्याने बुधवारी रक्षाबंधन रात्री उशिरा साजरी करणे योग्य ठरेल, असे पंडितांनी सुचवले.बुधवारी सकाळी 10 वाजून 13 मिनिटानंतर ते संध्याकाळी 8 वाजून 27 पर्यंत रक्षाबंधन साजरी करणे उचित ठरणार नाही. बुधवारी 9 वाजून 2 मिनिटानंतर बहिणींनी भावांना राखी बांधून घ्यावी. गुरुवारी सकाळीही रक्षाबंधनासाठी चांगला मुहूर्त आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात पूर्वी काही मिनिटांसाठी बहिणी भावाला राखी बांधू शकतात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी