29 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरराष्ट्रीयभावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीकडून स्वतःची किडनी भेट

भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीकडून स्वतःची किडनी भेट

रक्षाबंधनानिमित्ताने उत्सवाचे वातावरण असतानाएक भाऊबहिनीची एक अनोखी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील रायपूरमधील शीलाबाई आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी तिची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. शीलाबाईंचा भाऊ ओमप्रकाश धनगर यांना किडनी दान केली जाईल. बुधवारी रक्षाबंधन पार पडल्यानंतर काही दिवसांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाईल. आपली किडनी शीलाताई आपल्या भावाला भेटवस्तू म्हणून देत त्याच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

ओमप्रकाश धनगर (४८) यांना गेल्या वर्षी मे महिन्यात किडनीच्या तीव्र आजाराचे निदान झाले होते. त्यांची किडनी एवढी खराब झाली होती की त्यांना डायलिसिसची गरज होती. पहिली किडनी ८० % आणि दुसरी ९० % खराब झाली होती. त्याच्या कुटुंबीयांनी गुजरातमधील नडियाद येथील रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भावासाठी शीलाबाई यांनी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर एका किडनीवर त्या आपले आयुष्य हसतमुखाने जगायला तयार आहेत.

किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.नियोजित किडनी प्रत्यारोपणाच्या एक आठवडा आधी शीलाबाईंनी ओम प्रकाश यांना त्यांच्या सुरक्षिततेची प्रतिज्ञा म्हणून राखी बांधली.ओमप्रकाश आणि शीलाबाई दोघेही सध्या गुजरातमध्ये असून शस्त्रक्रियेची तयारी करत आहेत.शीलाबाई म्हणतात की ती तिच्या भावासाठी हे करत आहे कारण ती त्याच्यावर प्रेम करते आणि त्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे आहे.

नवी मुंबईतही बहिणीने भावला दिले जीवनदान

रक्षाबंधनानिमित्ताने उत्सवाचे वातावरण असताना नवी मुंबईत अनोख्या पद्धतीने भाऊ-बहिणीचा रक्षाबंधन साजरा झाला. ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या यकृताच्या आजाराने झगडणाऱ्या १७ वर्षांच्या भावासाठी त्याची बहीण धावून आली. आपल्या भावाला मरणयातनेतून वाचवण्यासाठी २१ वर्षांच्या बहिणीने त्याला आपल्या यकृताचा काही भाग दान करून नवे जीवनदान दिले.

राहुल पाटील (१७) याला अशक्तपणा आणि रक्ताच्या उलट्या होत होत्या. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही राहुलच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस राहुलच्या कुटुंबीयांनी नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले. डॉक्टरांनी राहुलची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत राहुलला ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या यकृताच्या आजाराचे निदान झाले. राहुलला नव्या यकृताची गरज होती.

नवी मुंबईतील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार,ऑटोइम्यून यकृत रोगामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृताच्या पेशींविरुद्ध कार्य करण्यास सुरवात करते. आजाराचे लवकर निदान झाल्यास औषधांनी उपचार करता येतात. पण राहुलच्या आजाराचे निदान उशिरा झाल्याने त्याला वारंवार रक्तस्त्राव, ओटीपोटात द्रवपदार्थ जमा होणे, कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला.

डॉ राऊत पुढे म्हणाले,“रुग्णाच्या बहिणीने तिच्या आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी निर्भीडपणे तिचे यकृत दान केले. आम्ही यकृताचा आकार आणि यकृताची गुणवत्ता तपासली जी राहुलच्या आवश्यकतेशी पूर्णपणे जुळते. त्याच्यावर वेळीच उपचार न केल्याने त्याला जीव गमवावा लागला असता.”

ऑटोइम्यून यकृत रोगामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृताच्या पेशींविरुद्ध कार्य करण्यास सुरवात करते. लवकर निदान झाल्यास औषधांनी उपचार करता येतात. राहुलच्या आजाराचे निदान उशिरा झाले आणि त्याला वारंवार रक्तस्त्राव, जलोदर (ओटीपोटात द्रवपदार्थ असामान्यपणे जमा होणे) आणि कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. वडील सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला असल्याने प्रत्यरोपणाची महागडी शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती.

रुग्णालय आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी शस्त्रक्रियेच्या आर्थिक खर्चासाठी मदत केली. वैद्यकीय तपासणीत राहुलची बहीण नंदिनीचे यकृत त्याच्याशी जुळले. 26 जून रोजी नंदनीने आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी निस्वार्थपणे तिच्या यकृताचा महत्त्वपूर्ण भाग दान केला.

हे ही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त थोरात, तांबे कुटुंबिय एकत्र

धनंजय मुंडेंनी साजरा केला रक्षाबंधन, जाणून घ्या बहिणीचे नाव

अवयवदान हे एक शक्तिशाली  कार्य आहे.आम्ही प्रत्येकाला अवयवदाते होण्यासाठी आणि त्यांच्या प्रियजनांचे आणि गरजू लोकांचे जीवन वाचविण्यास मदत करण्यासाठी प्रोत्साहन देतो. या भावंडांची कहाणी रक्षाबंधनाच्या वेळी आनंद आणि उत्सव घेऊन येईल, अशी आशा डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी