29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयमला चार मुले झाली कारण काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीच केले नाही :...

मला चार मुले झाली कारण काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीच केले नाही : भाजप खासदार रवि किशन

रवि किशन यांनी शुक्रवारी लोकसभेत लोकसंख्यावाढ नियंत्रण विधेयक मांडले, रवि किशन हे चार आपत्यांचे वडील आहेत. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असुन आज संसदेत ५० सदस्यांनी खासगी विधेयके लोकसभेत मांडली. भाजपचे खासदार रवि किशन यांनी शुक्रवारी लोकसभेत लोकसंख्यावाढ नियंत्रण विधेयक मांडले, रवि किशन हे चार आपत्यांचे वडील आहेत. आज तक या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले. ते म्हणाले की, मला चार मुले झाली तेव्हा लोकसंख्यावाढ नियंत्रण कायदाच अस्तित्वात नव्हता त्यामुळे काँग्रेसच याला जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसने आपल्या सत्ताकाळामध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत कोणतेही विधेयक मांडले नाही, जर असे विधेयक त्यांनी आणले असते तर इतकी मुले जन्माला आली नसती जर काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर आम्ही थांबलो असतो असे रवि किशन म्हणाले. या न्यूज चॅनलच्या मुलाखती दरम्यान रवि किशन यांच्यासह मनोज तिवारी यांच्यासह आणखी एकजण उपस्थित होते. मनोज तिवारी हे तीन मुलांचे वडील होणार आहेत.

हे सुद्धा वाचा
सामाजिक न्याय विभागात लबाडीला ऊत; 100 रुपयांच्या कवितेचे पुस्तक 684 रुपयात, तरतूद नसताना 36 कोटींची खरेदी!

युट्यूबवरच्या अश्लील जाहिरातीमुळे नापास झालो, आता ७५ लाख रुपये द्या, भरपाईची मागणी करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड

IAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

यावेळी बोलताना रवि किशन यांनी आपल्या पत्नीला प्रत्येक मुल झाल्यानंतर काय त्रास झाला याबाबत देखील यावेळी भाष्य केले. आयुष्यात स्थीर होण्यासाठीचा तो माझा स्ट्रगलींगचा काळ होता. त्यावेळी माझे मन विचार करत नव्हते, मी समजदार देखील नव्हतो. मी काम करत होतो. जेव्हा मी यशस्वी झालो, माझ्याकडे जेव्हा पैसा आला, मी आयुष्यात जेव्हा स्थिरस्थावर झालो तेव्हा मी माझ्या पत्नीकडे पाहिले, आज मला तिच्यासाठी मला खुप अपराधी वाटते. जर काँग्रेसने असे विधेयक आधी आणले असते तर आम्ही त्यावेळी थांबलो असतो, असा तर्क यावेळी रवि किशन यांनी मांडला. यावेळी ते म्हणाले या कार्यक्रमातून मी लोकसभेत गेल्यानंतर लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी