29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराष्ट्रीयअसंसदीय शब्दांची यादी जाहीर होणे म्हणजे सर्वात मोठी शोकांतिका

असंसदीय शब्दांची यादी जाहीर होणे म्हणजे सर्वात मोठी शोकांतिका

टीम लय भारी

दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरु होणार आहे. यासाठी संसदेच्या सचिवालयाकडून असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांना यादीत असलेल्या असंसदीय शब्दांचा वापर करता येणार नाही. पण संसदेच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विरोधकांना सत्य बोलण्यापासून मज्जाव घालता यावा, यासाठीच अशा प्रकारची यादी काढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

दरम्यान, यानंतर काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा संसदीय भाषणाचा उल्लेख करत आताच्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले आहे. संसदेकडून असंसदीय शब्दांची यादी जाहीर होणे ही शोकांतिका असल्याचे सुद्धा त्यांनी या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

‘पावसाळी अधिवेशनाआधी खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांच्या संपुर्ण संसंदीय कारकिर्दीत एकाही असंसदीय शब्दाचा उच्चार केला नाही किंबहु त्यांना त्यांचा कुठलाही शब्द परत घ्यावा लागला नाही…. ‘ असे ट्विट करत डॉ. जितेंद्र देहाडे यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे उदाहरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा :

पेट्रोल दराच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर भडकले

कोणाचे काय तर कोणाचे काय…? ‘आरे’च्या ‘कारे’वर सुमीत राघवनने केलेली प्रतिक्रिया वादात

नेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!