28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

ऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant accident ) याचा शुक्रवारी (दि. ३०) रोजी पहाटे कार चालवताना पेंग आल्याने भयंकर अपघात झाला. या अपघातात ऋषभला मोठी दुखापत झाली असून त्याची कार जळून खाक (Burn the car) झाली. आहे. दिल्लीहून उत्तराखंडला आईला भेटण्यासाठी जात असताना दिल्ली-देहरादून महामार्गावर (Delhi-Dehradun Highway) त्याची मर्सिडीज कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि मोठा अपघात झाला. यावेळी कारमध्ये तो एकटाच होता. तो स्वत:च कार चालवत होता. मात्र पेंग (sleepiness) आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटून अपघात झाला.

अपघातानंतर पोलीस आणि काही लोक त्याच्या मदतीला धावले. त्यानंतर ऋषभला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषभ पंतच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे देखील सांगितले आहे. उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले की, अपघातानंतर ऋषभ पंत कारच्या खिडकीची काच तोडून बाहेर पडला. अपघातात त्याच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला जोरदार मार लागला असून जखमा देखील झाल्या आहेत. अपघातानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

दरम्यान या अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असून ऋषभपंत जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागे त्याची अलिशान कार पेटलेली देखील दिसत आहे. दरम्यान डॉक्टरांनी ऋषभ पंतवर तातडीने उपचार करत त्याचे एक्सरे आणि इतर तपासण्या देखील केल्या. त्याच्या कपाळाला, गुडघ्याला आणि नडगीला जखमा झाल्या असून फॅक्चर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान गाडीने पेट घेतल्यामुळे त्याचे शरीर भाजले जाण्याचा धोका होता. मात्र सुदैवाने त्याच्या शरीराला कोठेही भाजलेले नाही.

अपघातानंतर ऋषभ पंत स्वत:च कारमधून बाहेर पडला आणि रस्त्याच्या कडेला येऊन बसला. यावेळी त्याच्याजवळील रोख रक्कम देखील रस्त्यावर पडली होती. ही रोख रक्कम जवळपास चार लाख रुपयांची असल्याचे देखील बोलले जात असून काही तरुणांनी रस्त्यावर पडलेले हे पैसे गोळा करुन नेल्याचे देखील लोकांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे ‘बेशरम रंग’ व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा ‘पठाण’ अडचणीत !

हिराबेन मोदी यांचे निधन; शोकमग्न पंतप्रधानांनी म्हटले, एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले !

‘गेल्या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या’

ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाल्यानंतर काही वेळातच तेथे हरियाना परिवहनची बस जात होती. अपघात पाहून या बसचे चालक सुशील कुमार यांनी बस थांबवली आणि मदतीला धावले. त्याचवेळी तेथून काही अंतरावर दुध डेअरी चालविणारे कुशलवीर सिंह देखील त्यांच्या काही कामगारांसह मदतीला धावले. ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकल्यानंतर २०० मीटर पर्यंत पलट्या खात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावून पडली. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अपघातानंतर तात्काळ पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेतली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी