30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये आरएसएसच्या 11 कार्यकर्त्यांना जन्मठेप; घरात घुसून केली होती सीपीएम कार्यकर्त्यांची हत्या

केरळमध्ये आरएसएसच्या 11 कार्यकर्त्यांना जन्मठेप; घरात घुसून केली होती सीपीएम कार्यकर्त्यांची हत्या

सीपीएम कार्यकर्त्याच्या हत्याप्रकरणी केरळमधील सत्र न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 11 कार्यकर्त्यांना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (RSS Workers Convicted) वेल्लारडा येथील महापालिका कर्मचारी नारायणन नायर यांची 2013 मध्ये घरात घुसून हत्या करण्यात आली होती. पीडित नायर यांची कुटुंबासमोरच हत्या केल्यानंतर नऊ वर्षांनी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.

तिरुवनंतपुरममधील नेयाट्टिनकारा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश कविता गंगाधरन यांनी हत्या प्रकरणातील तीन दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. कडक पोलीस बंदोबस्तात हा खटला चालवला गेला. नायरच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आलेल्या शेजाऱ्यांसह हल्ल्यातून वाचलेली मंडळी खटल्याच्या बाजूने उभी राहिली. पोलिसांनी 45 जणांना साक्षीदार म्हणून हजर केले. गुन्ह्याच्या वेळी संशयितांनी परिधान केलेले रक्ताने माखलेले कपडे आणि हत्यारे न्यायालयात सादर करण्यात आले. पुरावा म्हणून चाकू आणि तलवारीसह 23 वस्तू सादर केल्या.

5 नोव्हेंबर 2013 रोजी आरएसएस कार्यकर्त्यांनी नायर यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा शिवप्रसाद यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी शिव प्रसाद हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (सीपीएम) युवा-विद्यार्थी विंग असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेचा विभागीय सचिव होता. शिव प्रसादचे वडील नारायणन नायर यांनी सशस्त्र हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी पत्नी आणि दोन मुलांसमोर नायर यांची हत्या केली होती. या हल्ल्यात शिवप्रसाद आणि त्याचा भाऊ, सीपीएम कार्यकर्ते गोपकुमार; तसेच आई गिरिजाही गंभीर जखमी झाले होते.

परिसरातील भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आरएसएसने शिवप्रसाद यांना लक्ष्य केल्याचे विशेष सरकारी वकील एमआर विजयकुमार नायर यांनी सांगितले. वडिलांच्या हत्येच्या वेळी शिवप्रसाद हा पदवीचा विद्यार्थी होता. नारायणन नायर हे तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनचे कर्मचारी आणि सीपीएमचे शाखा सचिव होते. ते महापालिका कर्मचारी संघटनेच्या राज्य समितीचे सदस्यही होते.

न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांमध्ये मुख्य आरोपी राजेश (47) हा बीएमएस परिवहन कर्मचारी संघाचा प्रदेश सरचिटणीस आहे. याशिवाय, आरएसएस प्रचारक अनिल (32), प्रेम कुमार (36), प्रसाद कुमार (35), गिरीश कुमार (41) अरुण कुमार उर्फ ​​अँथप्पन (36), बैजू (42), साजीकुमार (43), अजयन उर्फ ​​उन्नी (33), बेनू (43) आणि गिरीश उर्फ ​​अनिकुट्टन (48) यांचा हत्या करणाऱ्या दोषीत समावेश आहे.

हेही वाचा :

RSS : आरएसएसने बॉम्बस्फोटांचे दिले प्रशिक्षण, स्वयंसेवकाच्या दाव्याने खळबळ

Rahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे आश्वासन

शेतक-यांचे देशव्यापी आंदोलन अधिक तीव्र होणार, लांब पल्ल्याच्या लढाईची तयारी; डॉ. अशोक ढवळे

नायर यांच्या हत्येनंतर उपनगरी भागात मार्क्सवादी आणि संघाच्या कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार भडकला होता. समाजकंटकांनी शेजारच्या अनेक घरांवर हल्ले केले करून काही घरांना आग लावली होती. जिल्हा प्रशासनाला परिसरात अनेक दिवस संचारबंदी लागू करावी लागेली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी