30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयसाकेत गोखले यांना फेक ट्विटप्रकरणात दुसऱ्यांदा जामीन मंजूर

साकेत गोखले यांना फेक ट्विटप्रकरणात दुसऱ्यांदा जामीन मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्यावर फेक ट्विट प्रकरणाशीसंबधीत दुसऱ्या दुसऱ्यांदा अटकेत असलेले तृणमुल काँग्रेसचे प्रवक्ता साकेत गोखले यांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्यावर फेक ट्विट प्रकरणाशीसंबधीत दुसऱ्या दुसऱ्यांदा अटकेत असलेले तृणमुल काँग्रेसचे प्रवक्ता साकेत गोखले यांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. याच प्रकरणात त्यांना या आधी देखील अटक केली होती. तेव्हा देखील न्यायालयाने गोखले यांना जामीन मंजूर केला होता. मात्र जामीन मंजूर केल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांना काही तासांतच अटक केली होती.

फेक ट्विट प्रकरणी साकेत गोखले यांना अहमदाबाद सायबर क्राईमच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर गोखले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. गुरूवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना अहमदाबाद येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गोखले यांना मोरबी पोलिसांत दाखल एका गुन्ह्यात अटक केली शुक्रवारी त्यांना या प्रकरणी न्यायालयाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.

साकेत गोखले यांनी 1 डिसेंबर रोजी एक न्यूज क्लिप ट्विट केली होती. ज्यात माहिती अधिकाराअंतर्गत कथितरित्या माहितीच्या अधारे दावा केला होता की मोरबी पुल दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्यावर 30 कोटी रुपये खर्च केला होता. गोखले यांनी म्हटले होते की, आरटीआयमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवघ्या काही तासांच्या दौऱ्यासाठी 30 कोटी रुपये खर्च केले होते. त्यात साडेपाच कोटी रुपये स्वागत, इव्हेंट मॅनेजमेंट आणि फोटोसेशनवर खर्च झाले. त्यानंतर मंगळवारी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने फॅक्ट चेक करत ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले होते.
हे सुद्धा वाचा
मला चार मुले झाली कारण काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीच केले नाही : भाजप खासदार रवि किशन

साकेत गोखलेंना नडले मोदींच्या मोरबी भेटीचे ट्विट, गुजरात पोलिसांनी केली अटक!

सामाजिक न्याय विभागात लबाडीला ऊत; 100 रुपयांच्या कवितेचे पुस्तक 684 रुपयात, तरतूद नसताना 36 कोटींची खरेदी!

साकेत गोखले यांच्या विरोधात भाजपच्या नेत्याने अहमदाबाद सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. तसेच त्यांना जयपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. गोखले यांना अटक केल्याची माहिती. तृणमुल काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली दिली होती. अहमदाबाद पोलिसांनी गोखले यांना अटक केल्यानंतर न्यायालयात तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मोरबी पोलिसांनी अटक केली होती. आज शुक्रवारी न्यायालयाने त्यांना दुसऱ्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी