29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयलाईटचे 80 हजारांचे  बील पाहून बिघडले मानसिक संतुलन, केले 'हे' कृत्य

लाईटचे 80 हजारांचे  बील पाहून बिघडले मानसिक संतुलन, केले ‘हे’ कृत्य

टीम लय भारी

अव्वाच्या सव्वा लाईटबील येण्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. लाईटचा थोडक्यात वापर करणाऱ्यांना जेव्हा मोठ्या आकड्यांचे बील येतात तेव्हा मात्र वीज वापर कर्त्यांच्या तोंडचे पाणी पळते. सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये वाढीव वीजेच्या बीलामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीने काय केले याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

लाईटचे 80 हजारांचे  बील पाहून बिघडले मानसिक संतुलन, केले 'हे' कृत्य

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका व्यक्तीला वीज बील 80 हजारांच्या घरात आल्याने त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले. वाढीव वीज बिलाचे धक्का सहन न झाल्याने ती व्यक्ती चक्क विजेच्या तारा असणाऱ्या टॉवरवर चढले. या घटनेचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.

नंदा का पुरा या गावात राहणारे अशोक निषाद यांनी विजेचे वाढीव बील आले. यावर बोलताना अशोक निषादची पत्नी मोना देवी म्हणाल्या, वीज वितरण विभागाकडून विजेचं बील वाढवून आल्याने अशोक तणावात आले, तब्बल 80,700 रुपये विजेचं बील आल्यामुळे त्यांचे मानसिक संतूलन खालावले. एवढंच काय तर वीज वितरण कंपनीकडून घरातील वीज कापण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वाढीव वीजबीलाचा फटका बसलेले हे निषाद यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परिणामी अशोक निषाद  यांची मानसिक स्थिती तणावामुळे आणखीच बिघडली आहे.

दरम्यान, पोलिसांनी याबाबत निषाद यांचा समजूत काढून टाॅवरवरून उतरवले आहे. हा व्हिडिओ सोशलमीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

हे सुद्धा वाचा…

अभिमानास्पद! ‘इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड’मध्ये भारताने सुवर्णपदकासह कमावली पाच पदके

‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजच्या टीझरवर भडकले बाबासाहेब पाटील

प्रवीण तरडे पोहोचले थेट लंडनच्या भाजी मार्केटमध्ये

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!