चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचा प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री याने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. यापूर्वी तुकाराम महाराजांबाबत बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या बोगस धीरेंद्र बाबाने आता कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांची बदनामी केली आहे. शिर्डी साई बाबा देव नाही, असा दावा धीरेंद्र महाराज याने केला आहे.
जबलपूरमध्ये आयोजित नेहमीच्या थोतांड स्टाईल दरबार कार्यक्रमात साईबाबांचा अवमान करण्यात आला. जबलपूर येथील सात दिवसीय श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी धीरेंद्र शास्त्रीने साईबाबांसंदर्भात मुक्ताफळे उधळली. त्याच्या तथाकथित दरबारात हा बोगस बाबा बागेश्वर लोकांना भेटून प्रश्नांची उत्तरे देत होता. साईबाबांवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री म्हणाला की, साईबाबा देव असू शकत नाही!

डॉक्टर शैलेंद्र राजपूत यांनी या बोगस बाबाला हाप्रश्न विचारला होता. “आपल्या भारतात अनेक साई भक्त आहेत. महाराष्ट्रात तसेच दक्षिणेत अनेक साईभक्त आहेत. परंतु सनातन साई भगवान मूर्तीपूजा नाकारत असताना साईंची पूजा केली जात असल्याचे दिसते. हे सनातनी पद्धतीनुसार केले जाते,” असे डॉ. राजपूत यांनी विचारले.
त्यावर बाबा बागेश्वरने उत्तर दिले, “आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च असल्याने त्यांचे पालन करणे प्रत्येक सनातनीचे कर्तव्य आहे. उठसूठ कोणीही संत होऊ शकतो. हिंदू धर्मात गोस्वामी तुलसीदासजी, सूरदासजी असे अनेक संत आहेत, महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत, कल्पपुरुष आहेत, पण ते देव नाहीत.”
स्वतःला पंडित म्हणवून घेणारा धीरेंद्र महाराज पुढे म्हणाला, की लोकांची स्वतःची वैयक्तिक श्रद्धा असते आणि आम्ही कोणाच्याही श्रद्धा दुखवू शकत नाही. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात; पण देव होऊ शकत नाहीत. साईबाबा देव असतील तर मग चांद-तारे कशासाठी, असेही हा बाबा म्हणाला.
हे सुद्धा वाचा :
पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती
तुकोबारायांबद्दल गरळ ओकणाऱ्या बागेश्वरबाबत गप्प का? रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना संतप्त सवाल
बागेश्वर महाराजावर शिंदे गटाचा संताप
धीरेंद्र शास्त्री याच्यावर अनेकांनी यानंतर जोरदार प्रहार केला आहे. उज्जैनमधील परमहंस अवधेशपुरी यांनी पंडित धीरेंद्रला संयमाचा सल्ला दिला आहे. आपल्या देशात झाडे, दगड, नद्यांना देव मानून त्यांची पूजा केली जाते. साईंच्या आरधनेनीही लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे परमहंस म्हणाले.