28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरराष्ट्रीयगायक दलेर मेहंदीला 'मानवी तस्करी' प्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास

गायक दलेर मेहंदीला ‘मानवी तस्करी’ प्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास

टीम लय भारी

नवी दिल्ली: सुप्रसिध्द पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा पटियाला कोर्टाने आज सुनावली आहे. 15 वर्षांपूर्वीच्या ‘मानवी तस्करी’ प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी मेहंदीला ताब्यात घेतले. .2003 मध्ये ‘बल बेडा’ गावातील ‘बक्शीश सिंह’ यांनी मेहंदी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. परदेशात पाठवण्यासंदर्भात 20 लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर अमेरिकेत  गुन्हा दाखल झाला होता.

‘ना ना ना ना ना रे ना रे ना‘…. ‘बोलो ता रा रा रा‘… अशी अनेक गाणी थिरकायला लावणारी आहेत. मेहंदी एक भारतीय गायक, संगीतकार, लेखक आहेत. भांगडा नर्तकांनी दलेर मेहंदीच्या गाण्यांना डोक्यावर घेतले. दलेर मेहंदीने बाॅलीवुडप्रमाणे पाॅप गाणी गाईली. त्यांनी भारतातल्या विविध भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी भांगडा जगभरात प्रसिध्द केला.

काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘मेटाआव्हर्स’मध्ये जमीन खरेदी केल्याची माहिती पुढे आली होती. मेहंदीने त्या जागेचे नाव ‘बल्ले बल्ले लॅंड‘ असे ठेवले होते. पार्टी नाईट या भारतीय ‘मेटाव्हर्स प्लॅटफाॅर्मवर’ व्हर्चुअल जमीन खरेदी केली असल्याची बातमी देखील पुढे आली होती.

हे सुध्दा वाचा:

असंसदीय शब्दांची यादी जाहीर होणे म्हणजे सर्वात मोठी शोकांतिका

असंसदीय शब्दांची यादी जाहीर होणे म्हणजे सर्वात मोठी शोकांतिका

महाराष्ट्र सरकारची आणखी एक मोठी घोषणा

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!