30 C
Mumbai
Friday, May 12, 2023
घरराष्ट्रीयकाँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे निलंबन

काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या राज्यसभेतील (Rajya Sabha) भाषणादरम्यानचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या (Congress)  राज्यसभा खासदार रजनी पाटील (MP Rajni Patil) यांनी समाज माध्यमात व्हायरल केल्याचे सांगत राज्यसभा सभापती जगदीप धनखड खासदार पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित (Suspension) केले. उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत हिंडेनबर्ग संस्थेने जारी केलेल्या अहवालानंतर या प्रकरणी संसदीय समितीची स्थापना करण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मागणी केली आहे. दरम्यान मोदींच्या भाषणावेळी याप्रकरणावरुन सुरु असलेल्या गोंधळाचा व्हिडीओ चित्रित करुन तो समाजमाध्यमात व्हायरल केल्याच्या आरोपातून खासदार रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान रजनी पाटील यांनी हि कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. Suspension of Congress Rajya Sabha MP Rajni Patil

रजनी पाटील म्हणाल्या. मी स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातून येते, कायद्याचे उल्लंघन करण्याची परवानगी मला माझी संस्कृती देत नाही. माझ्यावर आरोप करणे आणि शिक्षा देणे योग्य नाही. मी जाणीवपूर्वक काही केलेले नाही, मला न्याय मिळायला हवा. यामध्ये जाणीवपूर्वक माझे नाव घेतल्याने मी व्यतीत झाली असल्याचे खासदार पाटील म्हणाल्या. रजनीताई पाटील यांच्यावरील कारवाईनंतर विरोधकांनी सभात्याग केला.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट

मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य; बोहरा मुस्लीम समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार!

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घ्या

खासदार रजनी पाटील यांच्या निलंबनाची मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी सभापतींकडे केली होती. गोयल म्हणाले, काल काही खासदारांनी ज्या प्रकारे व्हिडीओ बनवले ते आक्षेपार्ह होते. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यावर धनकड यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेतल्याचे म्हणत सभाग्रहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कारवाई होणे गरजेचे असल्याचे म्हटले.


 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी