29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयगो फस्ट 'विमानाची' काच तुटली

गो फस्ट ‘विमानाची’ काच तुटली

टीम लय भारी

जयपूर: गुवाहाटीहून जयपूरला जाणा-या विमानात दोन दिवसांमध्ये तिसरी गडबड झाली आहे. ‘गो फस्ट’कडे  ए320 प्रकारची  60   विमान आहेत. यापैकी अनेक विमाने इंजिन बदलण्यासाठी बंद ठेवण्यात आले  आहेत. आज ‘गो फस्ट’ या दिल्लीहून गुवाहाटीला जाणा-या विमानाच्या खिडकीची काच तुटली. त्यामुळे विमान जयपूर विमानतळावर उतरवावे लागले. या विमानाने बुधवारी 12ः40 वाजता उड्डाण केले होते. विमानात बिघाड झाल्यामुळे जयपूर धावपपट्टीवर उतरावे लागले. मंगळवारी  देखील धावपपट्टीवर कुत्रा आडवा आल्यामुळे विमान उतरवावे लागले होते. तर सोमवारी  इंजिनात बिघाड झाल्यामुळे विमानाच रद्द करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे डीजीसीएने विमान कंपन्यांना दुरुस्ती शिवाय विमांनाचे उड्डाण  न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. जो पर्यंत मान्यता प्राप्त कर्मचारी उड्डाणाला परवानगी देत नाही तोपर्यंत विमान उड्डाण करता येणार नाही.

हे सुध्दा वाचा:

धनंजय मुंडेंनी केले ‘ओबीसी ‘आरक्षणाचे स्वागत

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी