27 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरराष्ट्रीयLeopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

Leopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

18 दिवसांपासून तब्बल 22 शाळा बंद आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी हस्तींचा वापर करण्यात आला आहे. कर्नाटक वन विभाग आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचे अभियान सुरू केले आहे.

कर्नाटक मधील बेळगावमध्ये बिबट्याची दहशत माजली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे सरकारने शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील यांनी शाळा ऑनलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 18 दिवसांपासून तब्बल 22 शाळा बंद आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी हस्तींचा वापर करण्यात आला आहे. कर्नाटक वन विभाग आणि बेळगाव जिल्हाअधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचे अभियान सुरू केले आहे.

या बिबट्याला रहिवासी क्षेत्रात फ‍िरतांना अनेकांनी पाहिले आहे. त्याने एका मजूरावर देखील हल्ला केला होता. वनविभाग आणि पोलीस असे 200 कर्मचारी बिबट्याच्या मागावर आहेत. बेळगावच्या गोल्फ मैदानात देखील त्याला लोकांनी पाहिले. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एकूण 22 शाळा बंद आहेत. बिबट्याच्या दहशतीने पालक आणि विद्यार्थी तणावामध्ये आहेत. वनविभागाने नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘Eknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला ‘एकनाथ खडसे’ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले ‘खडसावले’

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

Ajit Pawar :’पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणा विरोधकांना झोंबल्या- अजित पवार

आपल्या देशातील विविध भागांमध्ये अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. कमी होत चालेल्या जंगलांमुळे बिबट्या मानवी वस्तीमध्ये शिरु लागला आहे. त्यामुळे बिबट्या-मानव संघर्ष खूप वाढला आहे. नद्याची पात्रे आणि शेतशिवार ही बिबट्याची वस्तीस्थाने बनली आहेत. त्यामुळे बिबट्या आणि मानव हा संघर्ष जटील बनला आहे. 18 दिवस तब्बल 22 शाळा बंद आहेत ही बाब नक्कीच चिंताजनक आहे.

तसेच अनेक वेळा बिबट्या मानवी वस्तीमध्ये येऊ माणसांवर आणि प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलात त्यांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे बिबट्या शहरांमध्ये येतो, तसेच कुत्रा हे बिबट्याचे आवडते खाद्य असल्याने त्याचा शहरामधील वावर वाढला आहे. शहरांमध्ये तसेच गावांमध्ये गायींचे गोठे असतात. कोंबडया, बकऱ्या हे त्याला यायते खाणे मिळते. तसेच लपण्यासाठी जागा देखील मिळते. त्यामुळे बिबट्याने आपला मोर्चा शहरांकडे वळवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी