27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयपंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात

टीम लय भारी 

मथुरा (युपी) : कधी कोण काय करेल आणि कशामुळे प्रकाश झोतात येईल सांगणे तसे कठीणच. एका कंत्राटी सफाई कामगाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो कार्यालयात ठेवण्याऐवजी त्यांना केराची टोपली दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित कामगाराला निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा वृंदावन महापालिका कार्यालय येथील सुभाष इंटर काॅलेज जवळ पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकलेल्या स्वरूपात होते. दरम्यान कंत्राटी सफाई कामगार दुलीचंद यांनी ते फोटो उचलून इतर कचऱ्यासोबत वाहून नेऊ लागले.

तेवढ्यात तेथून जाणाऱ्या काही लोकांनी दुलिचंद यांना अडवले आणि नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचऱ्याच्या गाडीत घेऊन जाण्याविषयी चौकशी केली. यावरून सफाई कामगार आणि नागरिकांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर दुलीचंद यांनी कचऱ्यातून ती चित्रे काढली.

दरम्यान, या कचरा गाडीतून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो नेण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अधिकारी वर्गाला याची कुणकुण लागली.

यावर अधिक माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त सतेंद्र तिवारी म्हणाले, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून  कंत्राटी सफाई कामगारावर तातडीने कारवाई करून सेवा समाप्त करण्यात आली आहे.

या प्रसंगानंतर यावर नेटकऱ्यांमध्ये उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनेत सफाई कामगाराला नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो  कचऱ्यातून वाहून नेल्याची शिक्षा मिळाली, परंतु ज्या काॅलेजच्या आवरात हे फोटो टाकण्यात आले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का असा सुद्धा सूर यानिमित्ताने ऐकायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेला पुन्हा फटका; हजारो कार्यकर्त्यांनी धरली शिंदेगटाची वाट

‘मार्गारेट आल्वा‘ एनसीपीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा

पेट्रोल डिझेल स्वस्त झाले ! बघा…आता…काय काय महाग झाले…..

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!