30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयविमान कंपन्यांचे दुर्लक्ष; पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा उतरवले विमान

विमान कंपन्यांचे दुर्लक्ष; पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा उतरवले विमान

टीम लय भारी

नवी दिल्ली: दोन महिन्यात भारतीय विमानांचे अनेक अपघात होतांना वाचले आहेत. एका महिन्यात दोन वेळा भारतीय विमानांना पाकिस्तानमध्ये विमानांचे लॅण्डींग करावे लागले आहे. यावरुन विमान कंपन्यांचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
आज ‘इंडिगो’ कंपनीचे शारजाह-हैदराबाद विमान खराब झाल्यामुळे पाकिस्तानच्या कराची विमानतळावर उतरवले. 15 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे विमान प्रशासनांवर शंका उपस्थित केली जात आहे.कराची विमान तळावर या विमानाची तपासणी केली. तसेच प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी दुसरे विमान पाठविण्यात आले.

5 जुलैला दिल्लीहून दुबईला जाणारे विमानात बिघाड झाल्यामुळे पाकिस्तानच्या कराचीमध्ये उतरवण्यात आले होते. 14 जुलैला दिल्लीहून वडोदराला जाणारे एक ‘इंडिगो’ विमान जयपूरला बिघाड झाल्यामुळे उतरवण्यात आले होते. त्याच दिवशी दिल्लीहून मणिपुरला जाणारे ‘इंडिगो’ विमान खराब हवामानामुळे कोलकात विमानतळावर उतरवण्यात आले होते. यामध्ये 141 प्रवाशी होते. त्याच दिवशी कांडलाहून मुंबईला जाणारे विमान खराब हवामानामुळे 23 हजार फुट उंचीवरुन मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.

तर दिल्ली जबलपुर विमानात धूर येत होता. त्यामुळे हे विमान दिल्लीमध्ये उतरवण्यात आले होते. ही घटना 2 जुलैला घडली होती. त्यावेळी हे विमान 5 हजार फूट उंचीवर होते.19 जूनला पाटण्यात’स्पाइसजेट’ विमानात आगीच्या ज्वाळा निघू लागल्यामुळे उतरविण्यात आले होते. या विमानात 185 प्रवासी होते. त्याच दिवशी दुसरी घटना देखील घडली हे विमान दिल्लीहून गुवाहाटीला जात होते. या विमानात 165 प्रवासी होते.

हे सुध्दा वाचा:

यशाचे श्रेय घेण्यात ‘अमित शाह’ हुशार

देवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही…

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट…. नक्कीच वाचा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी