32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयSecurity of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी...

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र एक दहशतवादी भारता बाहेर सापडला असल्याने आर्श्चयाचा धक्का बसला आहे. रशियामध्ये सोमवारी इस्लामिक स्टेट म्हणजे IS चा एक दहशतवादी सापडला आहे.‍ रशियाच्या सुरक्षा एजन्सीने त्याला ताब्यात घेतले आहे.

भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र एक दहशतवादी भारता बाहेर सापडला असल्याने आर्श्चयाचा धक्का बसला आहे. रशियामध्ये सोमवारी इस्लामिक स्टेट म्हणजे IS चा एक दहशतवादी सापडला आहे.‍ रशियाच्या सुरक्षा एजन्सीने त्याला ताब्यात घेतले आहे. हा सुसाईड बॉम्बर भारतात धमाका उडवून देण्याच्या तयारीत होता. त्याच्या निशाणावर भारतातील मोठे नेते होते. म‍िळालेल्या माहितीनुसार रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विस म्हणजे FSB ने या दहशतवादयाला पकडले आहे.

तो मध्यआशिआई देशांमधला रह‍िवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भारतामध्ये हल्ला करण्यासाठी रशिया सोडून जाण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे भारतावर दहशवादी हल्ले होण्याची शक्यता वाढली आहे. यावर केंद्र सरकार कोणती पावले उचलते आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देली होती. त्या पर्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.‍ त्यानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला विरार मधून ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

तसेच मागच्या आठवडयात हर‍िहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक शस्त्र अस्त्र असलेली बोट सापडली आहे. त्याचा तपास सुरु आहे. ती ऑस्ट्रेल‍ियन नागरिक असलेल्या महिलेची आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. कारण आपल्या राज्यात अनेक वेळा दहशवादी हल्ले यापूर्वी झाले आहे. 1993, 26/11 हे मोठे हल्ले मुंबईवर यापूर्वी झाले आहेत. मुंबईत ज्या प्रकारचे हल्ले झाले तसे हल्ले देशाच्या इतर भागात होण्याची शक्यता देखील नकारता येत नाही. आपल्याला देशातील नेत्यांना वाटते की, केवळ पाकिस्तान हाच आपला शत्रू आहे. परंतु जगभरातील अनेक देशांमध्ये दहशतवादाची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत ही गोष्टी दुर्लक्षीत करुन चालणार नाही.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला देखील संपूर्ण जगाला हदरवून सोडणारा होता. आपल्या राज्यात सत्ता संघर्ष विकोपाला गेला आहे. त्यामुळे राज्याचा गाडा डळमळीत झाला आहे. त्याच परिस्थतीचा फायदा ते उठवू शकतात. आपण आपसात भांडत बसलो आहोत. केंद्रात बसलेले भाजप सरकार देशातील अनेक राज्यात आपल्याला हातपाय कसे पसरता येतील याची रणनिती आखण्यात मग्न आहे. त्यामुळे शत्रू कधीही घातपात करु शकतो हे सत्ताधाऱ्यांनी विचारात घ्यायला हवे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी