33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराष्ट्रीयNitin Gadkari : लवकरच‍ तुमच्या खात्यामधून 'टोल' ची रक्कम वसूल होणार -...

Nitin Gadkari : लवकरच‍ तुमच्या खात्यामधून ‘टोल’ ची रक्कम वसूल होणार – नितीन गडकरी

2024 अगोदर देशात 26 ग्रीन एक्सप्रेस महामार्ग तयार होणार आहेत. भारतामधील रस्ते हे अमेरिकेप्रमाणे होणार आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये टोल संबंधीत एक विधेयक तयार होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता महामार्गावर टोल भरावा लागणार नाही. तर तुमच्या खात्यातून टोल वसूली होणार आहे. टोल संबंधीत प्रकरणांचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केला आहे. पहिला प्रस्ताव हा ‘कार’ ना ‘जीपीएस’ प्रणाली लावण्यासंबंधी आहे. तर दुसरा प्रस्ताव हा अुधनिक नंबर प्लेट संबंधीत आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, 2024 अगोदर देशात 26 ग्रीन एक्सप्रेस महामार्ग तयार होणार आहेत. भारतामधील रस्ते हे अमेरिकेप्रमाणे होणार आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये टोल संबंधीत एक विधेयक तयार होणार आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे 23 ऑगस्टला नवी दिल्ली येथील ‘फ‍िक्की’ फेडरेशन हाऊसमध्ये रस्ते आणि राजमार्ग शिखर संमेल्लन प्रसंगी बोलत होते. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी 2019 मध्ये आम्ही एक नियम केला होता की, कंपनी फ‍िटेड नंबर प्लेट येणार आहे. आता टोल प्लाजा हटवल्यानंतर कॅमेरे लावण्याची नवीन योजना आहे. कॅमेरे लावल्यामुळे टोल बँक खात्यामध्ये जमा होण्यास मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

Liger :’लायगर’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच तेलगु भाषिकांची सर्वांत जास्त पसंती

Internet :ऑक्टोबरमध्ये ‘5 जी’ इंटरनेट सेवा सुरु होऊ शकते

ज्या गाडयांना नंबर प्लेट नाहीत त्यांना नंबर प्लेट लावायला सांगितले जाईल. रस्ते वाहतुकीसाठी लवकरच एक विधेयक तयार करण्याची तयारी सुरु आहे. टोल प्लाजामध्ये स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसविण्यात येणार आहे. सद्या सुरू असलेल्या नियमांबद्ल नितीन गडकरी म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला टोल रोडवरुन 10 किमी अंतर पार केले तरी देखील 75 किलोमीटरचे शुल्क आकारावे लागते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणावर सद्या अर्थ‍िक संकटात आहे. राजमार्ग प्राधिकरणाची परिस्थिती अत्यंत खराब आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी