33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयVIDEO : पाकिस्तानी शिष्टमंडळाला दाऊदविषयी प्रश्न विचारला असता पाकिस्तान चिडीचुप! व्हिडिओ व्हायरल

VIDEO : पाकिस्तानी शिष्टमंडळाला दाऊदविषयी प्रश्न विचारला असता पाकिस्तान चिडीचुप! व्हिडिओ व्हायरल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद यांना भारताकडे सोपवणार का, असे इंटरपोलच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या या शिष्टमंडळाला विचारण्यात आले असता, त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगले.

जेव्हा जेव्हा भारतात कुठेही दहशतवाद झाल्याच्या बातम्या येतात तेव्हा एक नाव प्रामुख्याने समोर येते ते म्हणजे दाऊद इब्राहिम. अनेकदा दाऊद इब्राहिम बाबात बोलले जाते तेव्हा दाऊदला पाकिस्तान छुपी मदत करत असल्याचे आरोप केले जातात. अनेकदा हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावेही दिले जातात. मात्र, यावेळी स्वतः पाकिस्तानकडूनच दाऊदचे नाव घेतल्यानंतर जे कृत्य केले गेले ते संशय बळकावणारे होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर इंटरपोलची 90 वी वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली आहे. 4 दिवस चालणाऱ्या या महासभेत जगातील 195 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, पोलीस प्रमुख, केंद्रीय ब्युरो प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानी शिष्टमंडळही दिल्लीत पोहोचले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद यांना भारताकडे सोपवणार का, असे इंटरपोलच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या या शिष्टमंडळाला विचारण्यात आले असता, त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगले. यादरम्यान पत्रकरांनी प्रश्न केला की दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचे आंतरराष्ट्रीय मंचांवर वारंवार सांगितले जात आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? पत्रकरारांनी विचारले की, ‘दाऊद पाकिस्तानात आहे का? तो किल्फ्टन रोड, कराची येथे राहतो का? यावर पाकिस्तानचे काय म्हणणे आहे? मात्र, या सर्व प्रश्नांवर पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसीन बट यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

Corona New Varient : दिवाळीपूर्वी धोक्याची घंटा! कोरोनाच्या नव्या अन् अधिक धोकादायक प्रकाराचा रुग्ण पुण्यात सापडला

Asia Cup : आशिया चषक 2023 पाकिस्तानात? मोठी अपडेट आली समोर

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हॅलिकॉप्टर क्रॅश! दर्शनासाठी गेलेल्या 7 भाविकांचा मृत्यू

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यावरून पाकिस्तानचे आणि दाऊदचे असे काही संबंध आहेत जे जगासमोर उघड होऊ नयेत असा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, अद्याप दाऊद आणि पाकिस्तानच्या संबंधांवरून कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याने याप्रकरणात कोणतेही विधान करणे अयोग्य ठरेल असेही मत अनकांनी व्यक्त केले आहे.

राजधानी दिल्लीत 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान महासभेची बैठक चालणार आहे. महासभा ही इंटरपोलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे आणि वर्षातून एकदा बैठक होते. या बैठकीत इंटरपोलच्या कामाचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णयही घेतले जातात. या बैठकीत आर्थिक गुन्हे आणि भ्रष्टाचाराच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. 25 वर्षांनंतर भारतात इंटरपोल महासभेची बैठक होत आहे. भारतात ही महासभा शेवटची 1997 मध्ये झाली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त यावेळची आमसभा नवी दिल्ली येथे आयोजित करण्याची विशेष संधी देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी