27 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराष्ट्रीय‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?

‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?

टीम लय भारी

नवी दिल्लीः हरियाणामधील मेवातमध्ये अवैध खाणकाम रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपीला खाण माफियांनी डंपरने चिरडले . हरियाणातील नूहमध्ये खाण माफियांकडून पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र विश्नोई यांच्यावर डंपर चढवून त्यांना ठार करण्यात आले आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.खाणीतून निघालेल्या ट्रकला ज्यावेळी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याच डंपरने त्यांना चिरडले. आता माफियांनी कायदा हातात घेतला आहे.

पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र विश्नोई तवडू येथे सेवा बजाववत होते. त्यावेळी त्यांना तवडूच्या टेकडीमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर ते छापा टाकण्यासाठी गेले. त्यांची कारवाई सुरू असताना खाणीत दगडाचा ट्रक बाहेर येत होता. त्यावेळी त्या ट्रकला थांबवण्यासाठी त्यांनी सूचना केली. त्यावेळी त्याच डंपरने त्यांना उडवण्यात आले. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले पोलीस उपअधीक्षकांना डंपरने धडक दिल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

हे सुध्दा वाचा:

शिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

शिवसेनेच्या तालुका प्रमुखाने उद्धव ठाकरे यांना रक्ताने लिहिले पत्र

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!