28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराष्ट्रीयसैनिक आपसात का भिडताहेत?

सैनिक आपसात का भिडताहेत?

टीम लय भारी

श्रीनगर: लष्कराच्या एका जवानाने गोळीबार केल्याची घटना काश्मिरमध्ये घडली. या गोळीबारामध्ये एक जवान ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. पुंछच्या ‘सुरनकोट’ येथील लष्काराच्या छावणीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चैकशी केली जात आहे. आशा प्रकारच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र संरक्षण मंत्री यावर काहीच का बोलत नाहीत. त्याचे कारण का? शोधत नाहीत हाच प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

लष्करी जवानांकडून आपलाच सहकारी मारणे ही घटना किती भयंकर आहे. आशा घटनांमध्ये वाढ होत आहे. तीन आठवडयापूर्वी पंजाबमध्येही अशीच घटना घडली होती. पंजाबच्या पठाणकोटीमध्ये ‘मीरथल कॅंन्टोन्मेंट’मध्ये एका जवानाने झोपलेल्या दोन जवानांवर गोळीबार केला होता. या वेळी दोन जवान जागीच ठार झाले होते. त्यावेळी हा आरोपी जवान फरार झाला होता. स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केले असून, पुढील तपास सुरु आहे.

सैनिक आपसात का भिडताहेत?

तर 4 महिन्यांपूर्वी अमृतसरच्या ‘बीएसएफ हेडक्वार्टर’मध्येही गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यावेळी देखील एका जवानाचा मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. मानसिक आजारपणामुळे त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले होते. त्याच्या बॅगेत डिप्रेशनवर मात करण्याची औषधं सापडली होती.

हे सुध्दा वाचा:

‘इडा पीडा टळो’ सिध्दी विनायक चरणी प्रार्थना

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

संसदेबाबतच्या बिनबोभाट निर्णयांवरून सुप्रिया सुळे यांनी उपटले केंद्र सरकारचे कान

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!